28 January 2021

News Flash

नियम आणि अटींचे पालन करूनच ‘कोर्ट’ची निवड – सेन

भारतातून ‘ऑस्कर’साठी चित्रपट पाठविताना सर्व नियम व अटी यांचे पालन करूनच ‘कोर्ट’चित्रपटाची निवड करण्यात आली

भारतातून ‘ऑस्कर’साठी चित्रपट पाठविताना सर्व नियम व अटी यांचे पालन करूनच ‘कोर्ट’चित्रपटाची निवड करण्यात आली आहे, असे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस सुप्राण सेन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अंतिम निवड प्रक्रियेच्या वेळी माझ्यासह फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस सी. कल्याण, उपसचिव दासगुप्ता आम्ही सर्व उपस्थित होतो. या निवड प्रक्रियेच्या वेळी कोणतीही चुकीची किंवा नियमबाह्य बाब घडली नाही, असेही सेन यांनी या पत्रकात म्हटले आहे. या निवड प्रक्रियेत राहुल रवैल हे ही सहभागी झाले होते.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला ही दुर्दैवाची बाब आहे. त्यानंतर रवैल यांनी जे काही मत किंवा वक्तव्य केले आहे, त्याविषयी आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही कारण ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही सेन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
‘कोर्ट’ या चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित मराठी सिनेमाचे नुकतेच ऑस्कर पुरस्कासाठी नामांकन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2015 3:20 am

Web Title: court select as per rule says sen
टॅग Court
Next Stories
1 ‘कोर्ट’च्या ऑस्कर नामांकनाने हुरळून जाण्याची गरज नाही- नसिरुद्दीन शहा
2 पाहाः अब्रामची छोटी बहिण ‘अमल’!
3 अमृताचा ‘फोटो विथ शाहीद’!
Just Now!
X