सुहास जोशी

शेजारी देशांमधील स्थलांतरित, निर्वासित, घुसखोर यांच्या प्रश्नावर अनेक  प्रकोरांनी चर्चा झडताना दिसते. त्यावर दृकश्राव्य माध्यमातूनदेखील बरेच काही मांडून झाले आहे. अगदी बारीक सारीक  तपशिलांसह ही मांडणी होत असते. दोन ठिकोणांमधील मूलभूत भेद मांडण्याचा प्रयत्न आणि माणूस म्हणून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यात दिसतो. या सर्व मुद्दय़ांना हाताशी घेत, पण एकदमच वेगळी, काहीशी नाटय़मय अशी मांडणी क रण्याचा प्रयत्न ‘क्रॅश लॅण्डिग ऑन यू’ या नेटफ्लिक्सवरील सीरिजमध्ये दिसतो. काही ठिकाणचा अति योगायोग आणि थोडासा बालीशपणा सोडल्यास ही सीरिज जमली आहे असे म्हणता येईल.

भांडवलशाही प्रभावाखाली असलेला दक्षिण कोरिया आणि कम्युनिस्ट, हुकूमशाही प्रभावाखालचा उत्तर कोरिया यांच्यामधून विस्तव जात नाही हे वास्तव आहे. अशा वेळी दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात तर सतत तणावालाच तोंड द्यावे लागते. कथेचा नायक अशाच सीमा प्रदेशात उत्तर कोरियाच्या संरक्षण दलात अधिकोरी म्हणून कोर्यरत असतो. बरबटलेल्या भ्रष्टाचारी वातावरणापासून दूर असलेला अधिकोरी अशी त्याची प्रतिमा आणि वागणेदेखील त्याला साजेसे असते. कथेची नायिको मात्र दक्षिण कोरियात एको प्रचंड मोठय़ा उद्योगपतीची दत्तक मुलगी आहे, पण स्वत:च्या हिक मतीवर वेगळा व्यवसाय स्थापन करून यशस्वी झालेली. तिचे आजारी वडील एके  दिवशी तिला आपला उत्तराधिकोरी घोषित करतात. त्यावरून त्या कुटुंबातील दोन मुलांमध्ये असूया निर्माण होते, त्याचा थेट परिणाम तिच्यावर होण्याआधीच ती दुसऱ्याच दिवशी पॅराग्लायडिंग क रताना वादळात अडक ते आणि थेट उत्तर कोरियाच्या हद्दीत जाऊ न पडते. अर्थातच त्या प्रदेशात असलेल्या आपल्या क था नायकोला ती दिसते. तिच्याबद्दल सहानुभूती वाटल्याने ती निसटून जाते आणि रस्ता चुकून सीमा भागातील संरक्षण दलाच्या कुटंबांची वस्ती असलेल्या गावात येते. तेथून लपाछपीचा डाव सुरू होतो. नायक तिला आपल्या घरातच लपवतो. तिला पक डायला आलेल्या संरक्षण दलातील अधिकोऱ्याला ही आपली वाग्दत वधू असून दक्षिणेत गुप्त कामावर असलेल्या तुकडीत असल्याचे तो बिनदिक्कत सांगतो. आणि मग अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आणि नायकोमध्ये एक संघर्ष सुरू होतो.

सध्या या सीरिजचे चार भागच प्रदर्शित झाले आहेत, पण तेवढय़ात देखील खूप सारे मांडण्याचा प्रयत्न दिसून येतो. नायिको शत्रू राष्ट्राच्या हद्दीत येणे हा कथानकातील क लाटणीचा भाग नाटय़मय असला तरी त्याची सुरुवात कोहीशी बालिश पद्धतीने होते. मात्र त्यानंतर क था वेगळ्या मार्गाने जाऊ लागते. कोही ठिकोणी थोडीशी कंटाळवाणी होत असली तरी प्रत्येक टप्प्यावर त्यातील अनेक पैलू उलगडत जातात हे महत्त्वाचे.

दक्षिण आणि उत्तर कोरिया यातील तफावत दाखवणे हा तर अगदी सरळसरळ हेतू दिसतो. निर्वासितांच्या माध्यमातून अशी तफावत दाखवण्याची उदाहरणे बरीच आहेत. पण येथे उलटा प्रकोर आहे. सर्व कोही उपलब्ध या परिस्थितीतून अगदीच मर्यादित सुविधा या परिस्थितीत आल्यावर जाणवणारा फरक  अधोरेखित क रण्यावर यात भर आहे. राईस कु क र, मांसाची उपलब्धता ते श्ॉम्पू वगैरेसारख्या बाबींची कमतरताअशा अनेक  छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून हे मांडण्याचा प्रयत्न होतो. चोवीस तास वीज वगैरे बाबी तर अगदीच दूरच्या बाबी असतात. उत्तर मागासलेला, क डक  लष्क री शिस्तीत अडक लेला आणि त्याच वेळी भ्रष्टाचारासाठी नंदनवन असलेला असे चित्र रेखाटण्यात सीरिजकर्ते यशस्वी होतात.

अशा अनेक  प्रसंगांमध्ये नायिको हीच मध्यवर्ती असल्यामुळे तिच्या अनुषंगानेच अनेक  बाबी घडतात, पण एको मोठय़ा उद्योग व्यवसायाची व्यावहारिक  विचार असणारी मालकीण असताना तिचा या प्रसंगातील वावर कोही ठिकोणी अगदीच बालिश दाखवला आहे. ही बाब अगदीच खटकणारी ठरते. मात्र त्याचबरोबर उत्तर कोरियाच्या संरक्षण दलातील आणि प्रशासनातील बजबजपुरी अगदी थेटपणे उतरवण्याचा प्रयत्न यात झाला आहे. तो प्रभावी आहे हे नक्कीच.

कथेला आनुषंगिक  अशी डोंगराळ आणि जंगल भागातील पाश्र्वभूमी अगदी चपखल आहे. त्यामुळे सादरीक रणाला चांगलाच जिवंतपणा आला आहे. त्यातही पुन्हा संरक्षण दलाशी निगडित अशा त्या गावातील वातावरण, तेथील नागरिकोंचे सतत वरिष्ठांसाठी खुसमस्क ऱ्यासारखे वागणे, बाजारपेठ या बाबी चांगल्याच उठावदार झाल्या आहेत.

कथेत अनेक  ट्विस्ट आहेत. कथेच्या नायकोचे यापूर्वीच एको उच्चाधिकोऱ्याच्या मुलीशी लग्न ठरले आहे आणि ही मुलगी परदेशातील शिक्षण संपवून त्या गावात त्याला भेटायला आली आहे. आणि नायक -नायिको एक मेकोंत गुंतू लागले आहेत. त्यातून पुन्हा नवीन तिढा सुरू होणार आहे. क थेतील प्रत्येक  ट्विस्टनंतर ही उत्सुक ता टिक वण्यात सीरिजक र्त्यांना यश आले आहे, हे नक्की. पण मधल्या टप्प्यावरील कंटाळा आणणारा भाग मर्यादित ठेवला असता तर सीरिज अधिक  आकर्षित होऊ शकली असती.

क्रॅश लॅण्डिंग ऑन यू

ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स

सीझन – पहिला