29 September 2020

News Flash

VIDEO : विराटच्या घराचं कर्णधारपद अनुष्काकडेच…

आपल्या पत्नीच्या याच अनोख्या स्वभावाविषयी विराटने एका मुलाखतीत त्याच्या मनीच्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

विराट कोहली, अनुष्का शर्मा

विराट कोहलीच्या कर्णधारपदामध्ये आयपीएलच्या ११ व्या हंगामात उतरलेल्या बंगळुरुच्या संघाला अपयश आलं. यंदाच्या हंगामातही आरसीबीच्या वाट्याला अपेक्षित यश आलंच नाही. असं असलं तरीही विराट कोहलीच्या पत्नीने म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्माने त्याला पाठिंबा देणं सोडलेलं नाही. अनुष्का विराटला प्रत्येक सामन्यासाठी प्रोत्साहित करत होती, त्याची साथ देत होती. याची प्रचिती अनेकांनाच सोशल मीडियाच्या माध्यमातून आली.

आपल्या पत्नीच्या याच अनोख्या स्वभावाविषयी विराटने एका मुलाखतीत त्याच्या मनीच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. या मुलाखतीतच ‘ऑफ फिल्ड’ म्हणजेच घरचं कर्णधारपद निर्विवादपणे अनुष्काकडेच असतं, असंही त्याने स्पष्ट केलं. ‘अनुष्काने नेहमीच योग्य तेच निर्णय घेतले आहेत. त्यामुळे तिच माझी ताकद आहे. माझ्या आयुष्यात तिच्यामुळे सकारात्मकतेचा वावर आहे. सहजीवनात तुम्हाला साथ मिळणाऱ्या व्यक्तीकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवाल… मी खरंच खूप नशीबवान आहे…’, असं विराट म्हणाला.

वाचा : प्रिन्स हॅरी- मेगन मार्कलच्या शाही विवाहसोहळ्याचा खर्च नेमका आहे तरी किती?

विराट आणि अनुष्का या दोघांनीही कधीच एकमेकांविषयीच्या भावना लपवून ठेवल्या नाहीत. मग ते विराटला एखाद्या सामन्यासाठी पाठिंबा देणं असो किंवा अनुष्काच्या एखाद्या चित्रपटाचं कौतुक करणं असो. ‘विरुष्का’चा हाच अंदाज त्या दोघांनाही इतरांच्या तुलनेत जरा जास्तच खास बनवून जातो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळेसुद्धा विराट आणि अनुष्काचं नातं पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. अनुष्काची क्रिकेटप्रती आणि आपल्या खेळाप्रती असणारी निष्ठा आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून व्यक्त होण्याची तिची अनोखी पद्धत याविषयीही त्याने आपलं मत मांडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2018 1:51 pm

Web Title: cricketer aggressive captain virat kohli reveals wife bollywood actress anushka sharma calls the shots at home watch video
Next Stories
1 IPL 2018: मुंबईच्या पराभवाने प्रिती झाली झिंगाट, व्हिडीओ व्हायरल
2 धोनीने रचला नवा विक्रम पण दिनेश कार्तिककडून धोका
3 कर्णधारपद सोडण्याच्या ‘गंभीर’ निर्णयावर दिल्लीचा कोच रिकी पॉन्टीगची प्रतिक्रिया
Just Now!
X