News Flash

हरभजनचं मोठ्या पडद्यावर पदार्पण; चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

सध्या सोशल मीडियावर हरभजन चर्चेत आहे.

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंह गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तो लवकरच ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

हरभजन सिंहने त्याचा पहिलावहिला तमिळ चित्रपट ‘फ्रेंडशिप’चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये हरभजनचा अनोखा अंदाज पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. तसेच सोशल मीडियावर हरभजनच्या अभिनयची प्रशंसा केली जात आहे. या चित्रपटात अॅक्शन सीन्सचा भरणा असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : ‘तू मूलगी आहेस का?’ असे म्हणत ट्रोल करणाऱ्याला इरफानच्या मुलाचे सडेतोड उत्तर

हरभजनने ट्विटर अकाऊंटवर ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने ‘शार्प, क्रिस्प, इंटेन्स.. माझा आगामी चित्रपट फ्रेंडशिपचा टीझर प्रदर्शित’ असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटाचा टीझर तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. तमिळ, तेलुगू आणि हिंदी.

‘फ्रेंडशिप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पॉल राज आणि सूर्या करत आहेत. यामध्ये अर्जुन आणि तमिळ ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लोसलिया मारियानेसन ही अभिनेत्री दिसणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 11:24 am

Web Title: cricketer harbhajan singh debut film friendship movie teaser is out avb 95
Next Stories
1 मोठ्या अपघातून बचावला सुयश टिळक, ‘माणुसकी जिवंत आहे’ म्हणत शेअर केली पोस्ट
2 Birthday Special : ‘टायगर’ नावाची रंजक कहाणी; जॅकी श्रॉफ की जुबानी
3 ‘नोमॅडलँड’, ‘बोराट २’ला गोल्डन ग्लोब पुरस्कार
Just Now!
X