20 February 2020

News Flash

PHOTO : ‘वोग’ मासिकाच्या कव्हर पेजवर मितालीच्या अदांचा षटकार

'वुमेन ऑफ द इयर... अॅण्ड द मेन वी ऑल लव्ह'

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज सध्या एका मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. या फोटोमध्ये ती बॉलिवूडचा ‘किंग’ अभिनेता शाहरुख खान आणि व्यवसाय क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या नीता अंबानी यांच्यासोबत झळकली आहे. ‘वोग इंडिया’ला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मासिकातर्फे तीन मुखपृष्ठ तयार करण्यात आली असून, त्यातील एका पृष्ठावर मितालीच्या कधीही न पाहिलेल्या अदा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत.

तिने पोस्ट केलेल्या या फोटोला अनेकांनीच रिपोस्ट केलं असून त्याला बरेच लाइक्सही मिळाले आहेत. ‘वोग इंडिया’च्या मुखपृष्ठावर झळकणं ही काही छोटी बाब नाही. त्यातही मितालीचा नवा अंदाज यात पाहायला मिळत असल्यामुळे चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. ‘वुमेन ऑफ द इयर… अॅण्ड द मेन वी ऑल लव्ह’ अशा टॅगलाइअंतर्गत ‘वोग’चे हे मुखपृष्ठ डिझाईन करण्यात आले आहेत.

क्रिकेट आणि कलाविश्व विविध कारणांनी एकत्र आल्याचं आपण नेहमीच पाहिलं आहे. त्याचीच ही पुढची पायरी म्हणता येईल. मितालीच्या या नव्या लूकविषयी सांगायचं झालं तर, यात तिने जोहाना ओर्टीजचा काळ्या रंगाचा ‘जमसूट’ घातल्याचं दिसत आहे. त्यासोबतच तिची हेअर स्टाईलही पाहण्याजोगी आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबतच बॉलिवूड अभिनेता शाहरुखही काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसोय. तर नीता अंबांनी यांनीसुद्धा काळ्या रंगाचा एक स्टायलीश ड्रेस घातल्याचं पाहायला मिळतं.

वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात

‘वोग’च्या अन्य मुखपृष्ठांवर ट्विंकल खन्ना, सोनम पूर, अनुष्का शर्मा, करण जोहर, पद्म लक्ष्मी, प्रियांका चोप्रा, नतालिया वडायनोव्हा असे प्रसिद्ध चेहरेही पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटींच्या मोहक अदा असलेलं वोगचं कोणतं कव्हर तुम्हाला आवडलं?

First Published on September 26, 2017 2:57 pm

Web Title: cricketer mithali raj shines on vogues tenth anniversary cover along with shah rukh khan and nita ambani photo
Next Stories
1 भाजपसाठी रजनीकांत जास्त योग्य- कमल हसन
2 ‘न्यूटन’च्या ऑस्कर एण्ट्रीमुळे प्रियांका नाराज?
3 कुलदीप यादवला ‘या’ अभिनेत्रीसोबत निर्जन बेटावर ‘डेट’वर जाण्याची इच्छा
Just Now!
X