News Flash

Bigg Boss 12 : श्रीसंतमुळे पहिला टास्क रद्द; शो सोडून जाण्याची दिली धमकी

हे पर्व जसजसं पुढे जाणार तसतशी त्याची लोकप्रियता वाढतच जाईल असं चित्र स्पष्ट होत आहे.

श्रीसंत

‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोला मोठ्या दणक्यात सरुवात झाली. यातच आता पहिल्याच दिवसापासून या घरात आलेल्या सेलिब्रिटींनी त्यांची खेळी दाखवण्यास सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमागचं एक कारण म्हणजे त्यातील टास्क. नवनवीन संकल्पनांचा वापर करत मोठ्या कलात्मकपणे हे टास्क आयोजित करण्यात आलेले असतात. अशाच एका टास्कमुळे क्रिकेटपटू श्रीसंतला ‘बिग बॉस’च्या घरातील इतर सहस्पर्धकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. किंहबुना घरातल्यांची ही अशी वागणूक पाहून बिग बॉसचं घर सोडण्याची धमकीही तो देत असल्याचं नव्या भागात पाहता येणार आहे.

१२ व्या पर्वाच्या सुरुवातीलाच ‘बिग बॉस’मध्ये प्रेस कॉन्फरन्स हे टास्क देण्यात आलं होतं. ज्या टास्कअंतर्गत कोणत्याही एका जोडीचं नाव घेऊन ते कशा प्रकारे कमकुवत आहेत आणि घरात राहणं त्यांच्यासाठी कशा प्रकारे कठिण आहे, हे सांगायचं होतं. ज्यामध्येच आता श्रीसंत सर्वांच्या निशाण्यावर असणार आहे. बिग बॉसच्या १२ व्या पर्वातील पहिलंच टास्क अपूर्ण राहिल्यामुळे त्याच्यावर अनेकांचा रोष ओढावणार आहे.

वाचा : Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’

प्रेस कॉन्फरन्सं टास्क पूर्ण न करु शकल्यामुळे नाईलाजास्तव श्रीसंत हे टास्क सोडतो. ज्यामुळे ‘बिग बॉस’च्या निर्णयानंतर हे टास्कच रद्द करण्यात येतं. हे टास्क रद्द झाल्यामुळे त्याच्यावर घरातील इतर सदस्यांनी आगपाखड केल्याचं पाहायला मिळत असून, आता त्याच्यावर घरातून बाहेर पडण्याची वेळ येते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हिंदी टेलिव्हिजन विश्वात सध्याच्या घडीला ‘बिग बॉस’विषयीच्या चर्चांनी जोर धरला असून आता हे पर्व जसजसं पुढे जाणार तसतशी त्याची लोकप्रियता वाढतच जाईल असं चित्र स्पष्ट होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 5:23 pm

Web Title: cricketer sreesanth threatens to leave reality show bigg boss 12 house
Next Stories
1 भजन गातो म्हणून मी काही साधू-संत नाही- अनुप जलोटा
2 VIDEO : चाहत्यांच्या गराड्यात अडकला बी- टाऊनचा ‘बॉडीगार्ड’
3 रणबीरविषयी आलियाची आई म्हणते..
Just Now!
X