News Flash

VIDEO : झहीर- सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये ‘विरुष्का’च्या परफॉर्मन्सने लावले चार चाँद

'पटियाला पेग', 'साड्डी गली' गाण्यावर थिरकले नेहरा, विराट

छाया सौजन्य- ट्विटर

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. २३ नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर या दोघांनीही मुंबईत मित्रमंडळींसाठी एका जंगी रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनमध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी अभिनेत्री सुश्मिता सेन, बिना काक, गौरव कपूर या प्रसिद्ध मंडळींनीही रिसेप्शनला हजेरी लावत झहीर- सागरिकाला शुभेच्छा दिल्या. सेलिब्रिटी आणि क्रीडा विश्वातील प्रसिद्ध चेहऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या रिसेप्शनमध्ये खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या धमाल परफॉर्मन्सने. विराट आणि अनुष्काच ‘स्टार ऑफ द नाइट’ ठरले असे, म्हणायला हरकत नाही. कारण, अस्सल पंजाबी गाण्यांवर विराटने धरलेला ठेका आणि त्याला मिळालेली अनुष्काची साथ या साऱ्यामुळे नवविवाहित दाम्पत्याच्या रिसेप्शनला ‘चार चाँद’ लागले.

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

जवळपास वर्षभरापूर्वी युवराज सिंगच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कॉकटेल पार्टीत विराटने ज्याप्रमाणे अफलातून भांगडा करत सर्वांना थक्क केले होते, त्याचप्रमाणे झहीरच्या लग्नातही त्याचा अस्सल पंजाबी अंदाज पाहायला मिळाला. विराटप्रमाणेच आशिष नेहरानेही पार्टीत धमाल केल्याचे पाहायला मिळाले. झहीरच्या या ‘टीममेट्स’नी पार्टीत नेमकी कशी धमाल केली हे जाणून घेण्यासाठी पाहा हे व्हिडिओ…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 7:03 pm

Web Title: cricketer virat kohli and bollywod actress anushka sharma set the dance floor on fire at zaheer khan sagarika ghatge wedding reception video
Next Stories
1 केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ‘इफ्फी’त ‘एस दुर्गा’ला प्रवेश नाहीच
2 अक्षय कुमारच्या मुलीसोबत दिसले हे स्टार किड्स
3 बॉबी देओलने जिंकली नव्या लूकची ‘रेस’
Just Now!
X