22 February 2019

News Flash

‘विरुष्का’ला मिळालं ‘व्हॅलेंटाइन्स डे’चं अनोखं गिफ्ट

सध्या सर्वत्र प्रेमाचे वारे वाहत आहेत.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

सेलिब्रिटी जोडप्यांविषयी चाहत्यांमध्ये नेहमीच कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळतं. काही जोडप्यांचं नातं पाहून तर बरीच प्रेमीयुगुलं त्यांचाच आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवतात. अशा जोडप्यांच्या यादीत सध्याच्या घडीला अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णाधर विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली आणि तेव्हापासून तर ‘विरुष्का’विषयी अनेकांच्याच मनात असणारं प्रेम ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली.

माध्यमांशी संवाद साधताना आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावत विराट आणि अनुष्का या दोघांनीही नेहमीच त्यांच्या नात्याची सुरेख बाजू चाहत्यांसोर ठेवली. ज्यामुळे चाहत्यांशी असलेलं त्यांचं नातं आणखीनच दृढ झालं. ‘विरुष्का’चा एकमेकांवर असणारा विश्वास आणि त्यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा घेतलेला निर्णय यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी अनुष्काच्या आईवडिलांनी त्यांना एक अनोखी भेट दिली आहे.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार अनुष्काचे बाबा कर्नल (निवृत्त) अजय कुमार शर्मा आणि आई आशिमा शर्मा शनिवारी एका पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी तेजस्विनी दिव्या नाईक या नवोदित लेखिकेच्या पुस्तकाची प्रत त्यांनी घेतली. आपली मुलगी अनुष्का आणि जावई विराटसाठी त्यांनी हे प्रेमकवितांचं पुस्तक घेतलं असून, ते विरुष्काला भेट स्वरुपात हे पुस्तक देणार आहेत. तेव्हा आता विरुष्काला ही खास आणि प्रेमाची भेट आवडते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या निमित्ताने सध्या सर्वत्र प्रेमाचे वारे वाहत आहेत. त्यातच अनुष्का आणि विराटमध्ये असणाऱ्या नात्याविषयी वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. पण, प्रेमाच्या या संपूर्ण वातावरणात ही भेट त्या दोघांसाठीही खास ठरेल यात शंका नाही.

First Published on February 9, 2018 12:34 pm

Web Title: cricketer virat kohli and bollywood actress anushka sharma get a special token of love ahead of valentines day