28 October 2020

News Flash

VIDEO : केप टाऊनमध्ये अनुष्का फिरण्यात दंग, तर विराटवर चढला भांगड्याचा रंग

हे दोघंही दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत

विराट कोहली, अनुष्का शर्मा

बहुचर्चित जोडपे म्हणून २०१७ चे वर्ष गाजवलेले आणि काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेले विरुष्का नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही प्रकाशझोतातच आहेत. लग्न, स्वागत समारंभ असे सर्व कार्यक्रम पार पाडल्यानंतर हे दोघेही दक्षिण आफ्रिकेला गेले. भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून विराटचे ‘लेडी लक’ म्हणजे अनुष्कासुद्धा त्याच्यासोबत या दौऱ्यामध्ये सहभागी झाली आहे. सोशल मीडियावर बऱ्याच ‘फॅन पेजेस’वरुन विरुष्काचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत. हे फोटो पाहता ‘विरुष्का’चा व्हेकेशन मोड ऑन झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.

कुठे हे दोघं एकत्र खरेदीला गेल्याचं पाहायला मिळतंय तर, कुठे विराट चक्क केप टाऊनच्या रस्त्यांवर क्रिकेटर शिखर धवनसोबत भांगडा करताना दिसतोय. विराटच्या आवडीनिवडी आणि त्याच्या दिलखुलास अंदाज पाहता तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा मनमुराद आनंद लुटतोय असेच म्हणावे लागेल. विराटप्रमाणेच अनुष्काही केप टाऊनची सफर करण्यात रमली असून, सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणेच ती सुट्टीचा आनंद घेत असल्याचे सोशल मीडियावरील फोटोंमध्ये पाहायला मिळतेय.

इतकेच नव्हे तर, अनुष्का इतर क्रिकेटर्सच्या पत्नी आणि प्रेयसींसोबतही धमाल करतानाचे काही फोटो पाहायला मिळत आहेत. अनुष्का आणि विराटचे हे फोटो पाहता एकमेकांसोबत मिळालेले हे क्षण ते फार आनंदात व्यतीत करत असल्याचे कळत आहे. मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यात अनुष्काच्या येण्यानेच महत्त्वाचे बदल घडले असे म्हणणाऱ्या विराटला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याच्या ‘लेडी लक’ची खऱ्या अर्थाने साथ मिळाल्यामुळे आता त्याच्या कामगिरीवर क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा : क्रिकेट माझ्या रक्तातच असल्याने पुनरागमन कठीण नाही: विराट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 12:39 pm

Web Title: cricketer virat kohli shows off his bhangra moves and actress anushka sharma exploring cape town south africa tour team india
Next Stories
1 ड्रंक अँड ड्राइव्हविरोधी लढ्यात UP पोलिसांना चुलबूल पांडेची साथ
2 जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार हे धमाल सिनेमे
3 Top 10 News: वाचा रजनीकांत यांचा राजकीय प्रवेश ते जावेद अख्तर यांची आगपाखड
Just Now!
X