News Flash

….जेव्हा विरेंद्र सेहवागने साक्षी तन्वरसाठी बनवला चहा

लाडवांचा आकार हा क्रिकेटच्या बॉलपेक्षाही मोठा असायचा

एका शोदरम्यान जेव्हा टीव्ही अभिनेत्री साक्षी तन्वर आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग एकत्र आले तेव्हा दोघांनी फार धमाल मस्ती केली. सध्या साक्षी एपिक या टीव्ही चॅनलसाठी त्योहार की थाली या शोचे सूत्रसंचालन करते. एका मुलाखतीत साक्षी म्हणाली की, वेळात वेळ काढून सेहवागन या शोमध्ये सहभागी झाला याचा मला आनंद आहे. साक्षीने आमिर खानच्या दंगल सिनेमात काम केले आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून जास्त कमाई केली होती.

शोदरम्यान सेहवागने त्याच्या क्रिकेट जगतातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. कोणत्याही सामन्यासाठी जाताना सेहवागची आई त्याच्यासाठी लाडूचा डबा द्यायची. सेहवागने सांगितले की, त्या लाडवांचा आकार हा क्रिकेटच्या बॉलपेक्षाही मोठा असायचा. सेहवाग सामन्यांदरम्यान फार जेवायचा नाही. त्यावेळी तो फक्त एक लाडू आणि एक लिटर दूध प्यायचा.

शोमध्ये त्याने साक्षीसाठी चहाही तयार केला. साक्षी म्हणाली की, पाहुणा म्हणून सेहवागचे आमच्या सेटवर येणं आणि त्याने माझ्यासाठी चहा करून देणं या सर्व गोष्टी मला फार आवडल्या. साक्षी म्हणाली की, सेहवागने तिला जेवणं करायलाही मदत केली. त्याने मला गाजर आणि मुळा किसून देण्यास मदत केली. जेवण तयार करण्यासही तो फार उत्सुक होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 9:03 pm

Web Title: cricketer virender sehwag cooked tea for dangal star sakshi tanwar in cooking show tyohar ki thali
Next Stories
1 जाणून घ्या, कोणकोणत्या राज्यात ‘पद्मावत’ला ‘नो एण्ट्री’
2 करणी सेनेची दहशत अद्यापही कायम, कलाकार नाही करणार ‘पद्मावत’चे प्रमोशन?
3 ‘या’ सिनेमात सलमान खान साकराणार १८ वर्षांच्या मुलाची भूमिका
Just Now!
X