24 November 2017

News Flash

झहीर- सागरिकाच्या लग्नाची तारीख ठरली

लग्नाच्या तयारीला मोठ्या उत्साहात सुरुवात

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 1:00 PM

छाया सौजन्य- सोशल मीडिया

क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील आणखी एक जोडी लग्न करण्याच्या मार्गावर असून, त्यांच्या लग्नाची तारिखही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, सहजीवनाच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.

एका वृत्तपत्राला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘झहीर आणि सागरिका नोव्हेंबर महिन्यात विवाहबद्ध होणार असून, २७ नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडणार असून, मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. या ‘बिग फॅट वेडिंग’साठी दोघांच्याही निकटवर्तीयांना आधीपासूनच निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार आहेत.’

हा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा कुठे पार पडणार, ही गोष्ट अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली असली तरीही त्यासाठीची तयारी मात्र अगदी उत्साहात सुरु आहे. झहीर आणि सागरिकाने काही महिन्यांपूर्वीच त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं होतं. त्याआधीपासूनच हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. क्रिकेटर युवराज सिंगच्या लग्नातही हे दोघं एकत्र पोहोचले होते.

😎

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

The sun did come out for a day ☀️#aboutyesterday #norainday

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

दरम्यान, एका मुलाखतीत आपल्या लग्नाविषयी माहिती देत सागरिकाने यंदाच्या वर्षअखेरीस आपण विवाहबद्ध होऊ ही बाब स्पष्ट केली होती. ‘या वर्षाखेर आमचं लग्न होईलच. पण, तारीख अजूनही ठरली नसल्यामुळे मी त्याबद्दल फार काही सांगू शकत नाही’, असं ती म्हणाली होती. सध्याच्या घडीला या जोडीच्या लग्नाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण असून, लग्नाच्याच दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

First Published on September 13, 2017 1:00 pm

Web Title: cricketer zaheer khan and actress sagarika ghatge to tie the knot november much awaited wedding