21 March 2019

News Flash

‘क्राईम पेट्रोल’चा हा बहुचर्चित अभिनेता करणार संजय दत्तसोबत काम

'प्रस्थानम'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार हा अभिनेता

'क्राईम पेट्रोल'चा हा बहुचर्चित अभिनेता करणार संजय दत्तसोबत काम

गेल्या आठ वर्षांपासून ‘क्राईम पेट्रोल’ या लोकप्रिय मालिकेच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारा अभिनेता अनुप सोनी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आगामी ‘प्रस्थानम’ या तेलुगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये तो भूमिका साकारणार आहे. यामध्ये संजय दत्त आणि मनिषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत.

अनुपसोबतच यामध्ये अली फजल आणि अमायरा दस्तुरदेखील झळकणार आहेत. १ जून रोजी नर्गिस दत्त यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त लखनऊमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली.

Video : आयुष- वरिनाच्या ‘लव्हरात्री’चा टीझर पाहिलात का?

अनुपने याआधीही संजूबाबासोबत काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘प्रस्थानम’च्या हिंदी रिमेकमध्ये तो संजयच्या कुटुंबातील एका व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. जुलैमध्ये हे दोघे एकत्र शूट करणार आहेत. टेलिव्हिजनचा आणखी एक चेहरा यामध्ये झळकणार आहे तो म्हणजे चाहत खन्ना. ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती.

अनुप सोनी

‘या’ पाच कारणांसाठी पाहा सलमानचा ‘रेस ३’

थ्रिलर फॅमिली ड्रामा या प्रकारात मोडणाऱ्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटाच्या निमित्ताने संजूबाबा आणि मनिषाची जोडी तब्बल दहा वर्षांनी एकत्र पाहता येणार आहे. याआधी १९९२ मध्ये ‘यल्गार’ चित्रपटातून त्यांनी एकत्र काम केलं होतं. ज्यानंतर दोघांच्याही बॉलिवूड कारकिर्दीला कलाटणी मिळाली होती.

First Published on June 14, 2018 7:22 pm

Web Title: crime patrol host annup sonii bags sanjay dutt prasthaanam hindi remake