News Flash

निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर; रुग्णालयाची माहिती

निशिकांत कामत यांच्यावर उपचार सुरु

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. निशिकांत कामत उपचार घेत असलेल्या रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. काही काळापूर्वी निशिकांत कामत यांचं निधन झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. परंतु, त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आल्याचं ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ अशा बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे निशिकांत यांना यकृताचा आजार झाला असून त्यांचं हे दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. याच काळात त्यांचं निधन झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती. परंतु, ही अफवा असल्याचं स्पष्ट होत आहे. तसंच अभिनेता रितेश देशमुख, रेणुका शहाणे या कलाकारांनीदेखील ही अफवा असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे.

दरम्यान, निशिकांत कामत हे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 2:56 pm

Web Title: critically acclaimed director nishikant kamat death news is wrong ssj 93
Next Stories
1 सुशांतच्या आठवणीत अंकिता पुन्हा भावूक; शेअर केली ‘ही’ खास पोस्ट
2 ‘देवा श्री गणेशा’ मालिकेत अभिनेता पंकज विष्णू साकारणार शिवशंकर
3 माधुरी, अटलजी आणि गोड पदार्थ… वाचा मजेशीर किस्सा
Just Now!
X