बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला तिच्या वाढलेल्या वजनामुळे एकेकाळी टिका सहन कराव्या लागल्या होत्या. बॉलिवूडच्या इतर अभिनेत्री त्यांच्या शरीराची खास काळजी घेतात. झिरो साइज फिगर बॉलीवूडचा ट्रेण्ड आहे. मात्र, सोनाक्षी यापूर्वी तिच्या फिगरविषयी कधीच गंभीर झालेली दिसली नाही. परंतु सध्या तिच्याकडे बघून जाणवते, की ती तिच्या फिगरविषयी आता विचार करायला लागली आहे. 

५ फेब्रुवारीला मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी सोनाक्षी सिन्हाला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ती पहिल्यापेक्षा खूपच बारीक दिसत होती. या छायाचित्रांमध्ये सोनाक्षीच्या रुपात पूर्वीपेक्षा आता झालेला बदल दिसतो आहे.  

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन ९० किलो इतके होते. परंतु, तिची मेहनत आणि निर्धाराने तिने ३० किलो वजन कमी केले. ती सध्या कठोर शेड्यूलचे पालन करत असून, दिवसातून दोनदा जिमला जाणे, योगा करणे असा तिचा दिनक्रम आहे. तिच्या डायटमध्ये कमालीचा फरक आला असून, प्रोटीनयुक्त पदार्थआणि ग्रीन टीचे सेवन ती करत आहे.

सोनाक्षीने काही दिवसांपूर्वीच तिचे हे छायाचित्र पोस्ट केले होता. या पोशाखात तिचा कमनीय बांधा दिसून येत आहे.