12 July 2020

News Flash

‘स्‍वागत नहीं करोगे..’ दंबग ३ चा फर्स्ट लूक रिलीज

'दबंग - ३' हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे.

बॉलिवूडचा दबंग खान उर्फ सलमान खानच्या ‘दबंग – ३’ चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. स्वत: सलमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दबंग – ३ चा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये सलमान नेहमीप्रमाणेच अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. या मोशन पोस्टरच्या खाली त्याने ‘स्वागत तो करो हमारा!’ हे दबंग मालिकेतले लोकप्रिय वाक्य लिहिले आहे.

‘दबंग – ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग – ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे. सलमानचा चाहता वर्ग पाहता याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ या तीनही चित्रपटांनी तिकीट बारीवर काही खास कमाल केली नव्हती. या पार्श्वभूमिवर विचार ‘दबंग -३’ काय कमाल करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2019 12:46 pm

Web Title: dabangg 3 teaser salman khan swagat toh karo hamara mppg 94
Next Stories
1 ड्रग्स देऊन ‘या’ अभिनेत्रीचे कॉलेजमध्ये झाले होते लैंगिक शोषण
2 अब कोई रोक नही सकता! नरेंद्र मोदींवर येणार आणखी एक बायोपिक
3 पाकिस्तानची चांद्रयान मोहीम? अर्शद वारसीने उडवली खिल्ली
Just Now!
X