29 September 2020

News Flash

‘दबंग ३’चे शूटिंग सुरू होताच टायटल ट्रॅकचा व्हिडिओ लीक

या गाण्यामध्ये सलमान खान तब्बल ५०० बॅकग्राऊंड डान्सर्स सह नाचताना दिसत आहे

'दबंग ३'

बॉलिवूडचा दबंग खान सलमान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे शीर्षकगीत मध्य प्रदेशमध्ये शूट केले जात आहे. या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी हा व्हिडिओ अक्षरश: उचलून धरल्याचे पहायला मिळत आहे.

सलमान खानला ‘दबंग ३’ चित्रपटाचे शीर्षकगीत हे भव्य दिव्य आणि रंजक बनवायचे असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. या गाण्यामध्ये सलमान खान तब्बल ५०० बॅकग्राऊंड डान्सर्स सह नाचताना दिसत आहे. या शीर्षकगीताचे चित्रीकरण मध्य प्रदेशमध्ये झाले असून हे गाणे शूट करण्यासाठी १३ दिवसांचा कालावधी लागला आहे.

या गाण्याच्या शुटिंग दरम्यान सलमानने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची डेनिम घातलेली व्हिडिओमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये सलमान अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. सलमानने याआधी त्याच्या काही डान्स स्टेप्सने चाहत्यांना अगदी वेड लावले होते. आता अशाच काही खास स्टेप्स सलमानने केल्याचे व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच सलमानने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो मध्य प्रदेशमधील मंडलेश्वर येथे सुरू असलेल्या शूटिंग दरम्यानचा आहे. ‘दबंग ३’ हा चित्रपट  डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच चित्रपटात सलमान खान सह अरबाज खान आणि सोनाक्षी सिन्हा दिसणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 1:37 pm

Web Title: dabangg 3 title track shooting video viral
Next Stories
1 जाणून घ्या, अक्षयच्या सुर्यवंशीच्या स्पेलिंगमध्ये का वापरलेत २ वेळा ‘O’
2 अनुराग कश्यपच्या चित्रपटातून कंगनाचा काढता पाय
3 Photos : ‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’चा दिग्दर्शक जो रुसो पाणीपुरीच्या प्रेमात
Just Now!
X