News Flash

सलमानची ऑस्ट्रेलियात ‘दबंगगिरी’; सोनाक्षीसोबत ठुमके अन् प्रभूदेवासोबत ‘जलवा’

ट्विटरवर सध्या 'दबंग टूर हॅशटॅग' ट्रेंड करताना दिसतोय.

सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा

सलमान खान सध्या ‘दबंग टूर’साठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याच्यासोबत ‘दंबग’ चित्रपटातील नायिका सोनाक्षी सिन्हा आणि डान्स मास्टर प्रभूदेवा देखील आहेत. नुकताच त्यांचा सिडनीमधील रंगारंग कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तिघांनी धम्माल केल्याचे पाहायला मिळाले. सलमान खानने अधिकृत ट्विटरवरुन कार्यक्रमाचे काही मनमोहक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये सलमान प्रभूदेवासोबत डान्स करताना दिसतोय. प्रभूदेवासोबतच्या नृत्याला सलमानने ‘प्रभू देवासोबत रिअल जलवा ‘ असे कॅप्शन दिले आहे. या दोघांनी ‘वॉंटेड’ चित्रपटातील ‘जलवा’ या गाण्यावर धम्माल केली. त्यांच्या या नृत्याला ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनीही कमालीची दाद दिली.

प्रभूदेवा सोबतच्या व्हिडिओशिवाय सलमानने सोनाक्षीसोबत नृत्य करतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. सोनाक्षीसोबतचा क्षण शेअर करताना सलमानने ट्विटवर लिहिलंय की, ‘सोनाक्षी सिन्हासोबत स्टेजवर धम्माल केली.’ याशिवाय सलमान या कार्यक्रमात त्याच्या ‘किक’ चित्रपटातील ‘जुम्मे की रात…’ या गाण्यावर थिरकताना दिसला. सिडनीतील धमाकेदार ‘परफॉर्मंस’नंतर दबंग टीम मेलबर्नला पोहचली आहे. या ठिकाणाचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते. ट्विटरवर सध्या ‘दबंग टूर हॅशटॅग’ ट्रेंड करताना दिसतोय.

Next Stories
1 ‘अजानचा मोठा आवाज असुरक्षिततेच्या भावनेपोटी’
2 ‘टिवटिवाट’नं उजाडली सोनू निगमची सकाळ; अजानचा व्हिडिओ केला शेअर
3 संजू बाबाची आमिरसोबतची टक्कर टळली, ‘भूमी’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत फेरबदल
Just Now!
X