आरती बोराडे

दबंग मालिकेतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा ‘दबंग ३’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा दबंग खान सलमानसह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, सुदीप किच्चा, अरबाज खान हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सलमानचे चाहते असणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल पण चित्रपटात रंजक कथा शोधणाचा प्रयत्न केल्यास प्रेक्षकांचा हिरमोड मात्र नक्की होईल. पण या भागात चुलबुल पांडेच्या स्टाईल मागील रहस्य उलगडले आहे.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

‘दबंग ३’ ही अशी कहाणी आहे ज्यामध्ये चुलबुल पांडे उर्फ सलमान खान आणि त्याची पत्नी रज्जो उर्फ सोनाक्षी सिन्हा आनंदाने आयुष्य जगत असतात. पण त्यांचे सुखी आयुष्य उध्वस्त करण्यासाठी चित्रपटातील खलनायक, बाली सिंग उर्फ सुदीप किच्चाची एण्ट्री होती. बालीच्या एण्ट्रीने चुलबुलला त्याच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींची आठवण होते. चुलबुल पांडेच्या भूतकाळात खुशी उर्फ सई मांजरेकर आणि चुलबुलचा रोमॅन्स पाहायला मिळतो. पण चुलबुलच्या आयुष्यात एक घटना अशी घडते की त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते.

चित्रपटाची सुरुवात ही उत्तर प्रदेशमधील एका श्रीमंत घरातील लग्नाने होते. या लग्नात काही गुंडे सोने आणि पैसे लुटण्यासाठी पोहोचतात. त्या गुंडांना पकडण्यासाठी चुलबुल पांडेची भिंत तोडून दबंग एण्ट्री होते. त्यानंतर चुलबुल आणि गुंडांमध्ये मारामारी होते. दरम्यान सलमान नृत्य करतो. पण अॅक्शन सीन्स आणि कॉमेडी या दोन टोकांना एकत्र आणण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न फसला असल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर चित्रपटात रज्जोची एण्ट्री होती. पण चुलबुल पांडेची पत्नी असल्यामुळे रज्जोचा गावात दबदबा असल्याचे पाहायला मिळतो.

चुलबुलचा सावत्र भाऊ मख्खी पांडे उर्फ अरबाज खान देखील पोलीस असल्याचे चित्रपटात पाहायला मिळते. एक दिवस अचानक एक मुलगी पळतपळत पोलीस ठाण्यात येते आणि तिच्या सारख्या अनेक मुलींची विक्री होणार असल्याचे सांगते. ते ऐकून मख्खी संतापतो आणि त्यांना सोडवण्यासाठी जातो. तेथे चुलबुल पांडे बुलेटवरुन येतो आणि मुलींना विक्रीसाठी नेणाऱ्या गुंडाना धडा शिकवतो. पोलीस त्या गुंडाना घेऊन ठाण्यात जातात. पण या सगळ्यांचा बॉस बाली सिंग असतो. बाली परत आल्याचे कळताच चुलबुलच्या जुन्या आठवणी जाग्या होतात.

या आठवणींमध्ये खुशीची एण्ट्री होते. मख्खीच्या लग्नासाठी आणलेली मुलगी चुलबुल पांडेला आवडते. ती मुलगी खुशी असते. संपूर्ण कुटुंब खुशीच्या घरी चुलबुलचे स्थळ घेऊन येतात. एक साधा, सरळ मुलगा पाहिल्यावर खुशीच्या घरातले लग्नासाठी तयार होतात. तसेच सलमान खुशीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास देखील तयार होतो. दरम्यान चुलबुल आणि खुशीचा रोमान्स पाहण्यासारखा आहे.

खुशी सलमानच्या वागण्यामुळे त्याचे नाव बदलून चुलबुल पांडे ठेवते. त्यानंतर ती गळ्यात घालायला माळ देते. त्याच बरोबर ती चुलबुलचा समोर लावलेला गॉगल काढून शर्टच्या मागच्या बाजूला लावते. सलमानची ही दबंग स्टाईल आधीच्या दोन भागांमध्ये पाहायला मिळाली आहे. तर दुसरीकडे बाली सिंग देखील खुशीच्या प्रेमात पडतो. पण चुलबुल आणि खुशीला एकत्र पाहून बालीच्या प्रेमाचे रुपांतर दुश्मनीमध्ये होते. तो खुशीला आणि तिच्या कुटुंबीयांना किडनॅप करतो. पुढे खुशीचे काय होते? सलमान सोनाक्षीसोबत लग्न का करतो? सलमान आणि बालीची दुश्मनी संपते की त्यांच्या दुश्मनीचे मैत्रीत रुपांतर होते? हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपटातील सईचा अभिनय कमालीचा आहे. तिचा हा पहिला चित्रपट असला तरी सोनाक्षीवर ती भारी पडल्याचे दिसत आहे. तसेच चित्रपटात उगाचच गाण्यांचा भरणा करण्यात आला असल्याचे दिसत आहे. चित्रपटात येणारा एखादा रंजक सीन गाण्यांमुळे प्रेक्षकांचा हिरमोड नक्की करतो.

‘लोकसत्ता ऑनलाइन’कडून चित्रपटाला तीन स्टार्स

boradeaarti@gmail.com