बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीचे कॅलेंडर शूट नुकतेच पार पडले. या कॅलेंडर शूटचा एक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार फोटोशूट करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानयांच्यापासून आलिया भट्टपर्यंत साऱ्यांनीच या व्हिडिओमध्ये सहभाग घेतला आहे. या व्हिडिओमध्ये एकूण २४ कलाकारांनी सहभाग घेतला. डब्बूबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल प्रत्येक कलाकार भरभरून बोलला.

https://www.instagram.com/p/BeCB3m5nXjk/

सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी नवीन वर्षाचा एक व्हिडिओ सोशल मीडीयावर शेअर करत असतो. यावर्षी २०१८ च्या कॅलेंडरचा व्हिडिओ त्याने फेसबुकवर शेअर केला आहे. हे त्याचे १९ वे कॅलेंडर आहे. यावर्षी कॅलेंडरमध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन, टाइगर श्रॉफ, सनी लियोनी, विद्या बालन, क्रिती सेनॉन आणि आलिया भट्ट कलाकार दिसणार आहेत. ‘बॉम्बे टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या फोटोशूटमध्ये ऐश्वर्याने खूप मदत केली. सगळ्या शूटमध्ये ती डब्बूसोबत काम करताना दिसली.

डब्बूने या कॅलेंडरबद्दल सांगितले की, मिस वर्ल्ड २०१८ मानुषी छिल्लर पहिल्यांदा आमच्यासोबत काम करत आहे. अशाप्रकारचे फोटोशूट तिने याआधी कधीच केले नव्हते. अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डब्बू रत्नानीसोबतचे फोटोशूट शेअर केले आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर, परिणीति चोप्रा, मानुषी छिल्लर, अभिनेता अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.