10 July 2020

News Flash

कियाराच्या टॉपलेस फोटोशूटचे भन्नाट मीम्स व्हायरल

पाहा, कियाराच्या फोटोवरील मीम्स

बॉलिवूड फोटोग्राफर डब्बू रत्नानीचं 2020 मधील नवीन सेलिब्रिटी कॅलेंडर नुकतंच प्रकाशित झालं. या कॅलेंडरमध्ये विद्या बालन,जॅकलीन फर्नांडिस, सनी लिओनी, कियारा आडवाणी या सारख्या सेलिब्रिटींच्या फोटोंचा समावेश आहे. या कॅलेंडरसाठी कलाकारांनी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. परंतु या सगळ्यात अभिनेत्री कियारा आडवाणीच्या फोटोंची जास्त चर्चा झाली. कियाराने टॉपलेस फोटोशूट केलं असून आता या फोटोंवरचे भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.

कियाराचा टॉपलेट फोटो पाहून काहींनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. या सगळ्यामध्ये काहींनी तिच्यावर मीम्स तयार केले आहेत. या मीम्समध्ये काहींनी कियाराला साडी परिधान केली आहे. तर काहींनी कबीर सिंगमधील शाहिदचा एक फोटो शेअर केला आहे.

काहींनी कियाराने फोटोशूट करताना जे झाडाचं पान वापरलं आहे. ते पान बकरी खातांना दाखवलं आहे.


दरम्यान, डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरमध्ये यंदा कार्तिक आर्यन, टाइगर श्रॉफ, वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस, सनी सिओनी, कियारा आडवाणी,कृती सेनॉन आणि विद्या बालन यांच्या फोटोंचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 2:38 pm

Web Title: dabboo ratnani calender 2020 kiara advani bold photoshoot twitter memes ssj 93
Next Stories
1 छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत तर मंत्र – अमिताभ बच्चन
2 BREAKING: रितेश-नागराज साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची ‘महागाथा’
3 स्वप्नील जोशीच्या लेकीची नेटकऱ्यांना भुरळ; व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X