19 March 2019

News Flash

माधुरीच्या शोमुळे झालं डान्सिंग काकांचे स्वप्न पूर्ण, घेतली गोविंदाची भेट

डान्सिंग काकांनी काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या ‘दस का दम’ या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.

डान्सिंग काका

‘आप के आ जाने से’ या गाण्यावर डान्स करुन एका रात्रीत प्रकाशझोतात आलेले ‘डान्सिंग काका’ म्हणजेच संजीव श्रीवास्तव यांची सध्या कलाविश्वात जोरदार चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी केलेल्या डान्सवर प्रभावित होऊन अनेक कलाकारांनी ‘डान्सिंग काकां’ची भेट घेतली. यामध्ये सुनील शेट्टी, सलमान खान या अभिनेत्यांचा समावेश आहे. आता सिलेब्रेटींच्या या यादीत आणखी एका व्यक्तीचं नाव जोडलं गेलं आहे.

विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आलेल्या ‘डान्सिंग काकां’नी काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या ‘दस का दम’ या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर आता नुकतीच ‘डान्स दीवाने’ या रिअॅलिटी शो मध्ये हजेरी लावल्याचं दिसून आलं आहे.

गोविंदा-माधुरीसह डान्सिंग काका

‘धकधक गर्ल’ म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणा-या माधुरी दिक्षितच्या ‘डान्स दीवाने’ या शोमध्ये डान्सिंग काकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी नुकतीच या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी डान्सिंग काकांनी ‘डान्स दिवाने’च्या सेटवर अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि गोविंदा यांची भेट घेतली होती.

‘डान्स दिवाने’च्या सेटवर डान्सिंग काकांचा प्रवेश होताच त्यांच्या चाहत्यांनी फोटो काढण्यास सुरुवात केली आणि बघताबघता हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. स्टेजवर पोहोचल्यानंतर डब्बू काकांनी पुन्हा एकदा ‘गोविंदा स्टाईल’चा डान्स करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर त्यांनी ‘मय से मीना से ना साकी से’ या गाण्यावर गोविंदासह डान्स केला.

गोविंदासह थिरकल्यानंतर संजीव यांनी गुडघे टेकून गोविंदाला नमस्कार केला. मात्र संजीवजी जमिनीवर बसण्यापूर्वीच गोविंदाने त्यांना सन्मानपूर्वक उठवत मिठी मारली. त्यानंतर डान्सिंग काकांनी माधुरी,गोविंदासह या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

दरम्यान, डान्सिंग काकांचा व्हिडिओ व्हायरल होऊन अनेक दिवस झाले असूनही त्याची लोकप्रियता तसुभरही कमी होत नसल्याचं दिसून येत आहे.

First Published on June 14, 2018 6:19 pm

Web Title: dabbu uncle dance with govinda on the dance deewane