दरवर्षी दहीहंडी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तसेच दहीहंडीच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. मात्र यंदा करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहीहंडीचे आयोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. परंतु, प्रत्येक जण साध्या पद्धतीने घरच्या घरी हा दिवस साजरा करत आहेत. या दिवसांमध्ये देखील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या ‘हमाल दे धमाल’ या चित्रपटातील ‘बोल बजरंग बली की जय’ हे गाणे दरवर्षी दहीहंडी उत्सवात कानावर पडते. आज आपण सर्वजण घरात बसून दहीहंडी हा सण साध्या पद्धतीने साजर करत असलो तरी अनेकांना या गाण्याची आठवण झाली असेल.

‘अशी ही बनवा बनवी’पासून ते अगदी ‘एक होता विदुषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगळी रुपे पाहण्याची संधी मिळाली. अशा या अभिनेत्याच्या गाजलेल्या चित्रपटांच्या गर्दीतील एक नाव म्हणजे ‘हमाल दे धमाल’. हा चित्रपट बऱ्याच कारणांनी चर्चेत आला होता. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची पाहुण्या कलाकाराची भूमिका असणाऱ्या या चित्रपटात वर्षा उसगावकर आणि लक्ष्याच्या केमिस्ट्रीने तर अनेकांचे लक्ष वेधले होतेच. पण, हमाल म्हणून सर्वांसमोर आलेला हा अभिनेता अनेकांनाच आपलासा वाटला. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या चित्रपटाचा उल्लेख अनेकदा होतोच. पण, त्यातही गोकुळाष्टमीच्या दिवसांमध्ये मात्र बेर्डेंची आठवण आल्यावाचून राहात नाही. ‘खिडकीतल्या ताई आक्का वाकू नका…पुढं वाकू नका…दोन पैसे देतो मला भिजवून टाका…’ असे म्हणत येणारे लक्ष्मीकांत बेर्डे आणि या गाण्यातून झळकणारा उत्साह आजही अनेकांना त्यावर ताल धरायला भाग पाडतो. ‘ढाक्कुमाकूम ढाक्कुमाकूम’ असे म्हणत ‘बोल बजरंग बली की जय’ची आरोळी फोडत ठेका धरणारे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे क्या बात.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गोपाळकाल्याचे गाणे खऱ्या अर्थाने गाजले ते म्हणजे त्याच्या अनोख्या अंजादामुळे. या गाण्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नाचण्याची अनोखी शैली म्हणजे गिरगावच्या मध्यमवर्गीय राहणीमानाकडून त्यांना मिळालेली भेट होती. गणेशोत्सव, गोकुळाष्टमी या सणांचे आणि गिरगावच्या वस्तीचे वेगळे नाते सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे या उत्सवांमध्ये सहभागी होणारा, विविध गाण्यांवर ठेका धरणाऱ्या लक्ष्याला याच राहणीमानाचा फार फायदा झाला असे म्हणायला हरकत नाही. गोविंदाचा उत्साह पाहता या प्रकारच्या गाण्यांमध्ये सहसा कोरिओग्राफीपेक्षा कलाकारांचा उत्साह आणि त्यातून उस्फूर्तपणे सर्वांसमोर येणारी अनोखी नृत्यशैलीच लक्षवेधी ठरते. इथेही अगदी तसच झाले होते. सुर्यकांत लवंदे यांनी चित्रीत केलेल्या आणि अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यामध्ये ड्रीम सिक्वेन्सही असल्यामुळे हेसुद्धा या गाण्याचं वेगळेपण आहे. हे गाणे जवळपास ३४ लाख लोकांनी पाहिले आहे.