News Flash

वैशाली सामंत यांचं ‘सुवासिनी’ गाणं ऐकलंत का ?

पाहा, वैशाली सामंतचं नवीन गाणं

‘ऐका दाजिबा’ अशी हाक देत गायनक्षेत्रातून घराघरापर्यंत पोहोचलेली लोकप्रिय गायिका म्हणजे वैशाली सामंत. हसतमुख चेहरा, मनमोकळा सूर आणि दिलखुलास स्वभाव यामुळे वैशाली विशेष लोकप्रिय झाली आहे. आज तिच्या गाण्याचे असंख्य चाहते असून तिचं प्रत्येक गाणं सुपरहिट ठरत असते. सध्या तिचं ‘सुवासिनी’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून ते विशेष चर्चिलं जात आहे.

सागरिका दास यांच्या संकल्पनेतून ‘रेट्रो V’ या म्युझिक अल्बम मधील ‘सुवासिनी’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याची रचना श्रीपाद जोशी यांनी केली असून प्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीर यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे झळकली आहे. तसंच या म्युझिक अल्बममधील गाणी या वर्षभरात प्रदर्शित होणार आहेत. या अल्बममध्ये एकूण आठ गाण्यांचा समावेश आहे.

दरम्यान, सागरिका म्युझिक आणि गायिका वैशाली सामंत यांचे नातं अनेक वर्षांपासून आहे. वैशाली सामंत यांचं ‘सागरिका म्युझिक ‘ बरोबर नातं जुळलं ते ‘ ऐका दाजीबा’पासून आणि मग ‘मस्त चाललंय आमचं ‘, ‘मेरा दादला ‘, ‘अंगणी माझ्या मनाच्या ‘, ‘घोटाळा’ आणि अशी अनेक गाणी वैशाली सामंतने सागरिका म्युझिक साठी गायली आणि ती लोकप्रिय झाली . या वर्षी या हिट गाण्यांच्या प्रवासात ‘सुवासिनी ‘ या गीताचा होणारा समावेशही रसिक श्रोत्यांना आनंद देणारा ठरेल . ‘रेट्रो V ‘ या अल्बममध्ये आठ रेट्रो स्टाइल गाण्यांचा समावेश असणे हे या अल्बमचे वेगळेपण ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 4:14 pm

Web Title: dajiba girl vaishali samant new song release ssj 93
Next Stories
1 संजय मोनेंसाठी मित्राने चक्क ट्रेन थांबवून ठेवली होती; कारण…
2 अनिल कपूर यांची बॉडी पाहून इंप्रेस झाला हृतिक, म्हणाला…
3 Video : सध्याच्या काळात संगीत क्षेत्रात काम करण्याची पद्धत म्हणजे….
Just Now!
X