18 January 2021

News Flash

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत होणार विशाल निकमची एण्ट्री

ज्योतिबाच्या या भव्यदिव्य रुपासोबतच यमाई आणि चोपडाई यांच्यादेखिल अवताराची गोष्ट मालिकेमध्ये उलगडणार आहे.

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत छोट्या ज्योतिबाचं मालिकेत दर्शन होत होतं. आता लवकरच मोठ्या ज्योतिबाची मालिकेत एण्ट्री होणार आहे. असुरांचा नाश करण्यासाठीच ज्योतिबा अवतारी रुपात येणार आहे. केदार विजय ग्रंथातील काही भागांना अनुसरुन कथा गुंफण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना आता मालिकेच्या रुपात ज्योतिबाच्या भव्यदिव्य रुपाचं दर्शन घेता येणार आहे.

ज्योतिबाच्या या भव्यदिव्य रुपासोबतच यमाई आणि चोपडाई यांच्यादेखिल अवताराची गोष्ट मालिकेमध्ये उलगडणार आहे. त्यामुळे ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेचे यापुढील भाग भक्तीरसाने परिपूर्ण असे असतील.

अभिनेता विशाल निकम मोठ्या ज्योतिबाच्या भूमिकेत दिसणार असून या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. ज्योतिबाच्या अनेक पौराणिक कथा वाचण्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट विशालने आत्मसात केली ती म्हणजे घोडेस्वारी. कमी कालावधीत विशाल घोडेस्वारी करायला शिकला आहे. यासोबतच विशालने या भूमिकेसाठी १२ किलो वजनही वाढवलं आहे. मूळचा सांगलीचा असल्यामुळे कोल्हापुरी भाषेचा लहेजा त्याला आपसूकच येत होता. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या यापुढील प्रवासासाठी विशाल खूपच उत्सुक आहे.

दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 5:08 pm

Web Title: dakkhancha raja jotiba marathi serial new updates ssv 92
Next Stories
1 अपूर्वा देणार ‘फ्रि हिट दणका’
2 ‘आदित्य १० वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता’; उदित नारायण यांचा खुलासा
3 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील अभिनेत्रीने केले कोर्टात लग्न
Just Now!
X