News Flash

ज्योतिबाला कसा मिळाला उन्मेष अश्व?

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतून उलगडणार उन्मेष अश्वाची कथा

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. ज्योतिबाच्या अवताराची गोष्ट या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. लवकरच मालिकेत ज्योतिबाच्या उन्मेष अश्वाची गोष्टही पाहायला मिळणार आहे. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार असणाऱ्या ज्योतिबाच्या कथा आपण वाचल्या आहेत. पण हा घोडा सफेद रंगाचा का? ज्योतिबाला हा घोडा कुणी भेट दिला? यामागची कथा ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतून उलगडणार आहे.

ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमने या मालिकेसाठी घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं आहे. मालिकेतला हा खास प्रसंग साकारण्यासाठी सेटवर कोहिनूर नावाच्या घोड्याची खास एण्ट्री झाली आहे. नावाप्रमाणेच हा घोडा कोहिनूर असल्याचं विशालने सांगितलं. या खास दोस्तासोबत माझी मैत्री झाली आहे. माझ्याकडून घोडेस्वारी करताना थोडी जरी चूक झाली तरी कोहिनूर मला सांभाळून घेतो. मी सेटवर आल्यावर पहिली कोणाची भेट घेत असेन तर तो आहे कोहिनूर. त्याला खाऊ घालणं त्याच्याशी गप्पा मारणं ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे. ज्योतिबाची भूमिका साकारण्यासाठी कोहिनूरचाही खूप मोलाचा वाटा आहे.

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतून ज्योतिबाला उन्मेष अश्व कसा मिळाला याची गोष्ट पाहायला मिळणार आहे. ही मालिका दररोज सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 5:14 pm

Web Title: dakkhancha raja jotiba marathi serial updates ssv 92
Next Stories
1 “मी रुग्णालयात दाखल होताच त्याने..”; रेमोने केलं सलमानचं कौतुक
2 काय?? फक्त १५ मिनिटांसाठी उर्वशी रौतेलाने घेतलं इतक्या कोटींचं मानधन
3 रुपाली भोसलेचा ‘कार’नामा; फोटो शेअर करत म्हणाली…
Just Now!
X