27 February 2021

News Flash

Video : ‘दमछाक..’ या मराठमोळ्या गाण्याचा सोशल मीडियावर धडाका

या गाण्यात बॉक्सर कशा पद्धतीन घडतो याचं चित्रण करण्यात आलं आहे.

Video : 'दमछाक..' या मराठमोळ्या गाण्याचा सोशल मीडियावर धडाका

कोणताही खेळ खेळण्यासाठी खेळाडूला अफाट कष्ट करावे लागतात, जीवतोड मेहनत ही करावीच लागते. एका बॉक्सरच्या घडण्याचं दर्शन घडवणारं ‘दमछाक’ हे ‘बेधडक’ या चित्रपटातलं गाणं चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. दमदार शब्द, उत्तम संगीत आणि अप्रतिम छायांकन ही या गाण्याची वैशिष्ट्ये आहेत. ‘बेधडक’ हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होत आहे.

राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोविंद टावरे यांचं चित्रपट लेखन, सुरेश देशमाने यांची उत्तम सिनेमॅटोग्राफी तर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘सुराज्य’ यांसारखे चित्रपट केलेल्या संतोष मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘दमछाक’ या गाण्यात बॉक्सर कशा पद्धतीन घडतो याचं चित्रण करण्यात आलं आहे. आपल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करणं, त्याबरोबरच दमणं, खचणं, चिडचिड करणं या सगळ्या भावभावना या गाण्यात टिपल्या आहेत. उच्च दर्जाच्या सिनेमॅटोग्राफीमुळे हे गाणं पाहण्याचा अप्रतिम अनुभव मिळतो. त्यामुळेच या गाण्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

वाचा : असाही एक ‘ड्राय डे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गिरीश टावरे याचं अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, प्रसाद लिमये, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. प्रवीण शशिकांत जगताप याने कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 6:50 pm

Web Title: damchak song from marathi movie bedhadak hit on social media
Next Stories
1 असाही एक ‘ड्राय डे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 VIDEO : कसम परेडसाठी ‘लागिरं झालं जी’च्या अज्यानं गाळला घाम
3 रणबीरकडे पाहणा-या दीपिकाला रणवीरने दिलेला ‘अॅग्नी लूक’ व्हायरल !
Just Now!
X