News Flash

रोमॅण्टिक सीन करताना गोविंदाची लागली होती वाट; सरोज खान सुद्धा ओरडल्या होत्या

'डान्स दिवाने ३' मंचावर गोविंदा आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाचा अनुभव शेअर केला.

govinda-dance-diwane-3

सिनेमांमधला रोमॅण्टिक आणि किसींग सीन्स हे नेहमीच चर्चेचे विषय ठरतात. सिनेमांमधले हे रोमॅण्टिक सीन्स कसे शूट केले जातात, हे प्रेक्षकांमध्ये कायमच औत्सुक्याचं ठरतं. पण रोमॅण्टिक सीन्स शूट करणं हे अभिनेता-अभिनेत्रींसाठी काही सोप्पं काम नसतं. एकेकाळी आपल्या अनोख्या स्टाइल आणि डायलॉगने रूपेरी पडदा गाजवणारा अभिनेता गोविंदा आजही लाखो फॅन्सच्या मनावर राज्य करतोय. पण गोविंदा रोमान्सच्या बाबतीत मात्र थोडे फिकेच होते. एकदा तर त्यांना सरोज खानकडून ओरडा पडला होता. अभिनेता गोविंदाने स्वतः हा खुलासा केलाय.

अभिनेता गोविंदा नुकताच डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने ३’ च्या मंचावर आले होते. यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीतील आपले वेगवेगळे अनुभव शेअर केले. तसेच त्यांनी आपल्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे अनेक गमतीदार किस्से शेअर केले आहेत. या शोमध्ये स्पर्धकांनी गोविंदा यांच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स परफॉर्म सादर केला. यातील स्पर्धक पियूषने सादर केलेला डान्स परफॉर्मवर बोलताना देताना नोरा फतेही हिने त्याच्या लाजण्यावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर गोविंदाने आपला पहिला चित्रपट ‘इल्जाम’ मधल्या रोमॅण्टिक सीनचा मजेदार किस्सा सांगितला.

अभिनेता गोविंदा यांनी आतापर्यंत करिश्मा कपूर, रविना टंडन, शिल्पा शेट्टी सारख्या अभिनेत्रींसोबत अनेक चित्रपटांत रोमान्स केलाय. पण सुरूवातीला त्यांचा पहिला चित्रपट ‘इल्जाम’च्या वेळी खूपच लाजाळू होते, हे खूप कमी जणांना माहित असेल. एक वेळ अशी होती की एखाद्या अभिनेत्रींना टच करण्यासाठी सुद्धा ते थरथर कापत होते. इतकंच नव्हे तर त्यांना रोमान्सचे क्लासेस देखील लावण्याची वेळ आली होती. ‘डान्स दिवाने ३’ च्या मंचावर आपल्या पहिल्या चित्रपटाचा किस्सा सांगताना गोविंदा म्हणाले, “मला आठवतंय…माझ्या पहिल्या चित्रपटात मला अभिनेत्री नीलमसोबत एक रोमॅण्टिक सीन शूट करायचा होता..आणि मी तो करू शकलो नाही. त्यावेळी सरोज खान यांनी मला एक कोपऱ्यात नेलं आणि म्हणाल्या, कधी तू कोणत्या मुलीसोबत रोमान्स केला आहेस का? मी म्हणालो नाही. त्यानंतर लगेचच त्यांनी एका असिस्टंट कोरिओग्राफरला मला रोमॅण्टिक सीन कसे करायचे हे शिकवायला सांगितलं. ते माझ्यासाठी खूप काही होतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावेळी गोविंदा यांनी कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासोबत ‘खुला है मेरा पिंजरा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स सुद्धा केला. यावेळी नोरा फतेही स्वतःला आवरू शकली नाही आणी ती सुद्धा त्यांच्यासोबत थिरकताना दिसून आली. या तिघांच्या धमाकेदार परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गोविंदाच्या या डान्सच्या व्हिडीओवर फॅन्स मोठ्या प्रमाणात कमेंट करत त्यांचं कौतुक करत आहेत. गोविंदाच्या डान्स पुढे सारं काही फिकं, चेहऱ्यावरच्या हावभावांसोबतच जबरदस्त डान्स करू शकतो तो फक्त गोविंदा असे वेगवेगळे कमेंट्स त्याच्या व्हिडीओवर दिसून येत आहेत. आपल्या डान्सने बॉलिवूडमध्ये कमाल करणारे गोविंदा आता ‘डान्स दिवाने ३’ च्या मंचावर धम्माल करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2021 6:31 pm

Web Title: dance deewane bollywood dancing star govinda opens up on his discomfort during romantic scenes prp 93
Next Stories
1 “ज्या ब्रॅंडमुळे माझी लायकी काढण्यात आली होती आज त्याच ब्रॅंडसोबत काम करायला मिळवण्याचा आनंद”
2 ‘आई शप्पथ आता मोत्यांची माळ’, हटके अंदाजामुळे रणवीर सिंग पुन्हा ट्रोल
3 राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा मोठा खुलासा; म्हणाली, “खरा आरोपी तर…!”