05 August 2020

News Flash

‘अमेरिका गॉट टॅलेंट’मध्ये वसई-भाईंदरचे नृत्यपथक अव्वल

या स्पर्धकांनी यापूर्वी भारतातील विविध स्पर्धेत सहभागी होत आपले नृत्य कौशल्य दाखवले आहे.

आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक; चित्तथरारक नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली

वसई : अमेरिकेत झालेल्या ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या स्पर्धेत वसई-भाईंदरच्या कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत सर्वोत्तम कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेत वसई-भाईंदर येथील ‘वी अनबिटेबल’ डान्स ग्रुपला आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मागच्या वेळीही ‘अमेरिका गॉट टॅलेंट’मध्ये सहभागी होऊन त्यांनी स्थान पटकावले होते. मात्र त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या पर्वात या स्पर्धकांनी चित्तथरारक नृत्याविष्कार सादर करून अमेरिकेच्या रसिकांची मने जिंकली. या स्पर्धेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा या देशांसह विविध देशांतील ४० संघ सहभागी झाले होते. त्यामधून ‘वी अनबिटेबल ग्रूप’ने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी या नृत्यपथकाला प्रथम क्रमांक मिळाल्याची घोषण झाली, त्यावेळी परीक्षकांसह प्रेक्षकांनी उभे राहून टाळय़ांच्या गजरात या स्पर्धकांवर अभिनंदनाचा वर्षांव केला.

या स्पर्धकांनी यापूर्वी भारतातील विविध स्पर्धेत सहभागी होत आपले नृत्य कौशल्य दाखवले आहे. चित्तथरारक व श्वास रोखायला लावणारे स्टंट व नृत्य यांसाठी हे स्पर्धक प्रसिद्ध आहेत. ‘वी अनबिटेबल ग्रूप’मध्ये नायगाव व भाईंदरमधील ३० मुलांचा समावेश आहे. या मुलांनी स्वप्निल भोईर व ओमप्रकाश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली आपली कला सादर केली.

प्रथम क्रमांकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व कलाकारांनी मेहनत घेतली. भारतासह इतर देशांतील प्रेक्षाकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले. प्रथम क्रमांक मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही अधिक जोमाने सराव करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत सहभागी होऊ.

– स्वप्निल पाटील, ‘वी अनबिटेबल ग्रुप’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 2:56 am

Web Title: dance group of vasai bhayandar win first prize in america got talent zws 70
Next Stories
1 एमबीबीएस डॉक्टरांची वानवा
2 रहिवाशांकडून पाणी कुलूपबंद
3 कल्याण डोंबिवली महापालिकेचा लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत
Just Now!
X