गेली काही र्वष सातत्याने ‘झलक दिखला जा’सारख्या शोमधून सेलिब्रिटी कलाकारांच्या नृत्याची परीक्षा बघणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित पहिल्यांदाच सर्वसामान्य तरुण-तरुणींच्या नृत्याची परीक्षा घेणार आहे. सेलिब्रिटींच्या शोमध्ये सेलिब्रिटी परीक्षकांबरोबर वावरणारी माधुरी पहिल्यांदाच या चकचकाटातून बाहेर पडून तिच्या आवडीच्या कामाकडे वळली आहे. ‘अँड टीव्ही’ वर सुरू होणाऱ्या ‘सो यू िथक यू कॅन डान्स’ या शोची मुख्य परीक्षक म्हणून माधुरी समोर येणार असून तिच्यासोबत पहिल्यांदाच टेरेन्स आणि बॉस्को हे दोघेही नृत्यदिग्दर्शक परीक्षक म्हणून दिसणार आहेत. पहिल्यांदाच या शोचा आणि पर्यायाने वाहिनीचा चेहरा म्हणून समोर आलेल्या माधुरीने या शोमधील स्पर्धकांशी बोलताना इंटरनेट हे या सगळ्यांसाठी शिकण्याचे मोठे माध्यम ठरले असल्याचे सांगितले.

‘सो यू थिंक यू कॅ न डान्स’ या शोची संक ल्पना वेगळी आणि जिव्हाळ्याची असल्याचे माधुरी सांगते. मूळ अमेरिकन शोचा भारतीय अवतार असलेल्या या शोमध्ये परीक्षक म्हणून वरुण धवन आणि हृतिक रोशन एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र या सगळ्या चर्चा बाजूला सारत हा शो माधुरीने आपल्या खांद्यावर घेतला आहे. ती एकटीच या शोची स्टार परीक्षक आहे. मात्र ‘झलक दिखला जा’पेक्षाही या शोमध्ये आपल्यावरची जबाबदारी मोठी असल्याचे माधुरीने सांगितले. त्या शोमध्ये आम्ही सेलिब्रिटींना नृत्यांत पारंगत करत होतो. त्यामुळे हळूहळू त्यांच्या नृत्यात होत जाणारी प्रगती हा त्या शोचा गाभा होता. इथे तसे नाही आहे. या शोमध्ये येणारे स्पर्धक मुळातच नर्तक आहेत. मात्र ते सर्वसामान्य घरांतून आलेले आहेत. ‘मी आजवर सातत्याने शोजच्या माध्यमातून स्पर्धकांचे परीक्षण करते आहे. पण ‘सो यू िथक यू कॅन डान्स’च्या व्यासपीठावर आलेले स्पर्धक हे देशाच्या विविध भागांतून आणि प्रामुख्याने मध्यमवर्गीय घरांतून आहेत. आणि तरीही त्यांना हॉिपग, टॉप रोसारखे अत्याधुनिक नृत्यप्रकार येतात हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले. हे प्रकार ते कुठे शिकले याबद्दल साहजिकच उत्सुकता निर्माण झाली. पण जेव्हा त्यांनी इंटरनेटच्या मदतीने आम्ही शिकत आहोत हे म्हटल्यावर नवलही वाटले आणि आनंदही झाला.’ माधुरीची स्वत:ची ऑनलाइन डान्स अकॅडमी आहे. आपण ऑनलाइन माध्यमातून नृत्य शिकवण्याचा जो निर्णय घेतला तो किती योग्य होता, याची प्रचीती या अनुभवातून आल्याचे माधुरीने सांगितले.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

‘सो यू िथक यू कॅन डान्स’ या शोचे स्वरूपही अत्यंत वेगळे आहे. यात ‘स्ट्रीट डान्सिंग’ आणि ‘स्टेज डान्सिंग’ असे दोन गट असणार आहेत. स्ट्रीट डान्सिंग हा अर्थात बॉस्कोचा विषय आहे आणि लॉरेन्स स्टेज डान्सिंग सांभाळणार आहे. मी स्वत: स्टेज डान्सर आहे. मात्र बॉलीवूड कलाकार असल्याने स्ट्रीट डान्सिंगचेही अनेक प्रकार हिंदी चित्रपटांतील नृत्यात वेळोवेळी येतात. तरीही स्ट्रीट डान्सिंगचे अनेक प्रकार, अनेक नवीन शब्द यांचा मला शोध लागतो आहे. त्यामुळे नव्याने शिकणे सुरू असल्याचे माधुरीने सांगितले. ‘गुलाब गँग’ आणि ‘देढ इश्किया’ या दोन चित्रपटांनंतर माधुरी मोठय़ा पडद्यापासून दूर राहिली आहे. काही चांगली कथा असल्याशिवाय आपण चित्रपट करणार नसल्याचे तिने स्पष्ट केले. मात्र सध्या छोटा-मोठा पडदा किंवा डिजिटल माध्यमे यात काहीही फरक उरलेला नाही. ही सगळी माध्यमे एकरूप झाली असून तुम्हाला कुठल्याही माध्यमातून काम करून लोकप्रियता मिळवता येते, असा आपला अनुभवही तिने सांगितला. दरम्यानच्या काळात स्वत:चा असा एखादा वेगळा शो विकसित करण्यावरही विचार सुरू असून सध्या तरी या शोवरच माधुरीने लक्ष केंद्रित केले आहे.