16 December 2017

News Flash

आता ‘शेमलेस सेल्फी’मुळे ट्रोल झाली ‘दंगल गर्ल’

नेटीझन्सना आवडला नाही तिचा 'हा' अंदाज

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 13, 2017 2:46 PM

फातिमा सना शेख

‘दंगल’ चित्रपटात आपल्या धाकड अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी फातिमा सना शेखवर पुन्हा एकदा नेटिझन्सनी निशाणा साधला आहे. फातिमाने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला, ज्यामुळे तिच्यावर टीकांचा भडीमार होऊ लागला आहे. चार दिवसांपूर्वी तिने एक सेल्फी पोस्ट करत ‘शेमलेस सेल्फी’ असे कॅप्शन दिले. काही लोकांना तिचा हा अंदाज पसंत न पडल्याने सोशल मीडियावर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.

साइड पोजमध्ये काढलेल्या या सेल्फीमध्ये फातिमाने साडी नेसली आहे. मात्र या साडीमुळेच ती ट्रोलचा शिकार झाली आहे. ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. साडी नेसता येत नसेल तर नेसू नकोस,’ अशी कमेंट एका युजरने केली तर दुसऱ्याने म्हटले की, ‘साडीचा तरी किमान अपमान करू नकोस.’ युजर्सच्या या कमेंटवर फातिमाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Shameless selfie😬📸 credit for Saree @swatimukund 😘😘

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

या फोटोवरून वाद होणार याचा अंदाज असल्याने कदाचित तिने ‘शेमलेस सेल्फी’ असे कॅप्शन दिले असावे. कारण यापूर्वीही तिच्या एका फोटोवरून नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली होती. जीक्यू मासिकासाठी फोटोशूट केल्यानंतर त्यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यावेळी रमजानचा महिना सुरू होता. रमजानसारख्या पवित्र महिन्यात स्वीमसूट घालणे चुकीचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले होते.

वाचा : ‘मुंबईत आलो तेव्हा खिशात फक्त ४० रुपये होते’

बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांच्या पोशाखावरून, कपड्यांवरून टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ईशा गुप्ता, प्रियांका चोप्रा, दिशा पटानी, सोनम कपूर, निया शर्मा या अभिनेत्रींवरही त्यांच्या पोशाखावरून टीका झाली होती.

First Published on October 13, 2017 2:46 pm

Web Title: dangal fame fatima sana shaikh trolled for her shameless selfie