News Flash

VIDEO: अशा रितीने आमिर खान बनला ‘हानिकारक बापू’

आमिरचा महावीर सिंग फोगट बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता हेच खरे.

छाया सौजन्य- यु ट्यूब

‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचत आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेतून एका महत्त्वाकांक्षी वडिलांची व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच आमिरच्या मुलींच्या भूमिकेतून अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटासाठी अभिनेता आमिर खान आणि त्याच्या ऑनस्क्रिन मुलींनी चांगलीच मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये खिळवून ठेवण्यासाठी कलाकारांनी चांगलाच घाम घाळला आहे. आमिरचा महावीर सिंग फोगट बनण्यापर्यंतचा प्रवास इतकाही सोपा नव्हता हेच खरे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर या चित्रपटातील ‘हानिकारक बापू’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सध्या हे गाणे त्याच्या शब्दांसाठी आणि अनोख्या चालीसाठी अनेकांच्याच प्लेलिस्टचा भाग झाले आहे.

हे गाणे सोशल मीडियावरही गाजत असताना नुकतेच या गाण्याचे ‘अनप्लग्ड व्हर्जन’ यु ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील चित्रीकरणादरम्यानचे ‘बिहाइंड द सीन्स’सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ अनेकांच्याच पसंतीस उतरत आहे.

आपल्या मुलींनी उत्तम कुस्तीपटू बनावे यासाठी एक पिता आपल्या मुलींशी कठोरपणे वागतो. त्यावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या मुलींनी गायलेले गाणे म्हणजे ‘हानिकारक बापू’. चित्रपटातील या गाण्यास ज़ायरा वसीम आणि सुहानी भटनागर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. यातील ‘हानिकारक बापू’ अर्थातच आमिर खान आहे. पहाटे लवकर आपल्या मुलींना उठवून त्यांना धावायला लावणे त्यांच्याकडून व्यायाम करून घेणे या सर्व गोष्टी आमिर करताना दिसतो. हे गाणे शेअर करत आमिरने म्हटले होते की, ‘हानिकारक बापू’ हे गाणे त्या सर्व मुलांसाठी आहे ज्यांना आपले वडिल स्वास्थ्यासाठी हानिकारक आहेत असे वाटते. आपल्या ट्विटर अकाउन्टवरूनही आमिरने हे गाणे शेअर केले होते.

नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. आमिरसोबतच अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटामध्ये महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 7:33 pm

Web Title: dangal how aamir khan became the haanikarak baapu watch video
Next Stories
1 नोटाबंदीचा स्वप्नील-सुबोधच्या ‘फुगे’ला प्रदर्शनापूर्वीच फटका
2 प्रेमभंगाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी आलिया जाणार सुट्टीवर
3 डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीबद्दल हे काय बोलून गेला शाहरुख..
Just Now!
X