20 November 2019

News Flash

‘शोले’तील सांबाच्या मुली आता बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

स्केटिंगवर आधारित या चित्रपटाचं नाव 'डेजर्ट डॉल्फीन' असं आहे.

‘शोले’ या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीत इतिहास घडवला. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर छाप पाडली. चित्रपटातील ‘अरे ओ सांबा.. कितने आदमी थे?’ हा गब्बर सिंगचा डायलॉग तर आजही अनेकांच्या तोंडी आहे. यामध्ये सांबाची भूमिका साकारली होती अभिनेते मोहन माकिजानी उर्फ मॅक मोहन यांनी. आता मॅक मोहन यांच्या मुली बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

मॅक मोहन यांच्या मंजरी आणि विनती या दोन मुली स्केटबोर्डिंगवर आधारित बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. ‘डेजर्ट डॉल्फीन’ असं या चित्रपटाचं नाव आहे. मंजरी लेखिकी-दिग्दर्शिका आहे तर विनती सहलेखिका आणि निर्माती आहे. मंजरी आणि विनती त्यांच्या या चित्रपटातून महिला सशक्तीकरणाचा संदेश देणार आहेत.

या चित्रपटात राजस्थानमधल्या एका ग्रामीण भागातील १६ वर्षीय प्रेरणा आणि लॉस एंजिलिसमधल्या ३४ वर्षीय जेसिकाची कथा दाखवण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटासाठी सेट उभारण्याचं काम सुरू आहे. उदयपूरच्या खेमपूर गावात यासाठी स्केटिंगचं मैदान बनवण्यात येणार आहे. मध्यप्रदेशच्या एका गावावर आधारित स्केटबोर्डिंगचे माहितीपट पाहून मी चित्रपटाचा विचार केला असं मंजरीने सांगितलं.

First Published on May 18, 2019 12:33 pm

Web Title: daughters of mac mohan sholay samba set for bollywood debut to make a film
Just Now!
X