News Flash

Video : डेव्हिड वॉर्नरच्या लेकींचा भन्नाट ‘बाला’ डान्स

या डान्सपुढे अक्षय कुमारही पडेल फिका

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याचं भारतप्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचंही त्याला वेड आहे. बॉलिवूडच्या शीला की जवानी या प्रसिद्ध गाण्यावर त्याने डान्स केला होता. तसंच डेव्हिड वॉर्नरने आपलं दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर असलेलं प्रेमदेखील दाखवून दिलं होते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुन याच्या बुट्टाबोम्मा आणि ज्युनियर NTRच्या पक्का लोकल या गाण्यांवर त्याने डान्स करत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर आता वॉर्नरच्या लेकींचा बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावर केलेला डान्सही चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडिस वॉर्नर यांनी लॉकडाउन काळात साऱ्यांचं भरपूर मनोरंजन केलं. वॉर्नरच्या साथीने तिनेदेखील अनेक गाण्यांवर डान्स केला. काही वेळा त्यांच्यातील रोमँटिक अंदाजही दिसून आला. पण आता ‘हम कुछ कम नही’ म्हणत त्याच्या लेकींनीही बॉलिवूडच्या बाला या अक्षय कुमारवर चित्रित झालेल्या गाण्यावर डान्स केला.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

When your daughters want to do their own Bala dance #bala #dance #family

A post shared by David Warner (@davidwarner31) on

हाऊसफुल ४ या चित्रपटात अक्षय कुमारने बाला या गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर या गाण्यातील डान्स स्टेप्स बऱ्याच लोकप्रिय झाल्या होत्या. बाला गाण्यातील स्टेप्स करून दाखवण्याचं एक चॅलेंजदेखील सोशल मीडियावर गाजलं होतं. अनेक सेलिब्रिटींना हे चॅलेंज स्वीकारत या गाण्यावर ताल धरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 5:08 pm

Web Title: david warner daughters dance to akshay kumar hit bollywood bala song see video vjb 91
Next Stories
1 “टीव्हीने माझ्यावर बंदी आणली म्हणून बॉलिवूडकडे वळलो”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
2 सुशांत आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार का? अमित शाह यांनी दिलं उत्तर
3 ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम अभिनेत्री अर्चना निपाणकर विवाहबद्ध
Just Now!
X