‘सब टीव्ही’वरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून अभिनेत्री दिशा वकानी प्रसिद्धीच्या झोतात आली. ती साकारत असलेली दयाबेनची भूमिका लोकप्रिय झाली होती. दिशाने नुकताच मालिकेतील तिचा शेवटचा भाग चित्रीत केला होता. ती काही महिन्यांसाठी या मालिकेतून ब्रेक घेणार आहे. दिशा गरोदर असल्याने प्रसूती रजेवर जात आहे. त्यामुळे काही काळासाठी ती मालिकेत दिसणार नसल्याचे समजते.
आठ महिन्यांची गरोदर असलेल्या दिशाने १७ सप्टेंबर रोजी ‘तारक मेहता..’चा तिचा शेवटचा भाग चित्रीत केला. चित्रीकरणाच्या वेळी मालिकेची संपूर्ण टीम तिची खूप काळजी घेत होती. तसेच तिला त्रास होऊ नये यासाठी प्रॉडक्शन हाऊसकडून तिला सेटवर कमीत कमी वेळ थांबावे लागेल, यादृष्टीने तिच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले होते. तसेच तिची सासू तिची काळजी घेण्यासाठी सतत सेटवर असायची.
अबब! प्रियांकाच्या या ड्रेसची एवढी किंमत
दिशाने गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये मयुर पांड्या याच्याशी विवाह केला. दिशाची अनुपस्थिती लक्षात घेता मालिकेच्या कथा लेखकांनीही पुढच्या भागांचे लेखन करण्यास सुरुवात केली आहे. दिशाने ‘खिचडी’ या मालिकेत तर ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘मंगल पांडे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 3:52 pm