07 April 2020

News Flash

भीमसेन देठे, प्रतिमा जोशी यांना ‘दया पवार स्मृती पुरस्कार’

कवी, कथा-कादंबरीकार भीमसेन देठे आणि ज्येष्ठ पत्रकार, लेखिका प्रतिमा जोशी यांना यावर्षीचा ‘दया पवार स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला

कवी, कथा-कादंबरीकार भीमसेन देठे आणि ज्येष्ठ पत्रकार, लेखिका प्रतिमा जोशी यांना यावर्षीचा ‘दया पवार स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पद्मश्री दया पवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा १९ वा पुरस्कार सोहळा असून २० सप्टेंबरला माटुंग्यातील कर्नाटक संघात होणाऱ्या सोहळ्यात या दोघांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली आहे.
पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘रंगवेध’ या नाटय़संस्थेच्या वतीने दया पवार यांच्या निवडक कवितांचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे हिरा पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2015 10:09 am

Web Title: daya pawar smruti puraskar
टॅग Entertainment
Next Stories
1 सुझानचे ऋतिकच्या मित्राशी शुभमंगल?
2 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलीवूडचा ‘खिलाडी’ सरसावला
3 पाहा : ‘दगडी चाळ’मधील ‘मोरया’ गाणे
Just Now!
X