23 September 2020

News Flash

पहा अजयच्या ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक

आता अजय देवगण आणि तब्बू 'दे दे प्यार दे' या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत

अजय देवगण

बॉलिवूडमध्ये अॅक्शनपटांसाठी नावाजला जाणाऱ्या रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ चित्रपटात अभिनेता अजन देवगन आणि तब्बू हे एकत्र पहायला मिळाले होते. त्यांचा हा चित्रपट आणि आमिर खान निर्मिती ‘सिक्रेट सुपरस्टार’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. परंतु ‘गोलमाल अगेन’ने आमिरला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर राज्य केले होते.

आता अजय देवगण आणि तब्बू ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. तसेच हा चित्रपट अकिव अली दिग्दर्शीत करणार आहेत. हा चित्रपट १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय आणि तब्बूसोबत राकूल प्रित सिंगदेखील चित्रपटात झळकणार आहे. या जोडीला पुन्हा एकदा सोनेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

‘टोटल धमाल’ चित्रपटाच्या यशानंतर अजय देवगनला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. आता अजय एस. एस. राजामौलींच्या ‘RRR’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटामध्ये राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्ट देखील असणार आहे. राजामौलींचा हा चित्रपट ३० जुलै २०२०ला प्रदर्शित होणार असून तेलगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि इतर प्रादेशिक होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:46 pm

Web Title: de de pyar de movie poster
Next Stories
1 ‘ख्वाडा’ फेम भाऊराव कऱ्हाडे घेऊन येत आहेत ‘हैद्राबाद कस्टडी’
2 ‘बधाई हो’चा रिमेक या चार भाषांमध्ये- बोनी कपूर
3 योग्य शिक्षणच काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतो- सलमान खान
Just Now!
X