02 March 2021

News Flash

Video : …म्हणून विजय देवरकोंडाने ‘त्या’ चाहतीला सावरलं

'बिग बॉस तामिळ ३'च्या सेटवर घडला हा प्रकार

विजय देवरकोंडा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा याची क्रेझ केवळ टॉलिवूडमध्येच नाही, तर बॉलिवूडमध्येही आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच विजय देवरकोंडाला भेटण्यासाठी चाहते प्रचंड आतुर असतात. त्यामुळे अनेक वेळा चाहते त्याला भेटल्यानंतर भावूक होतात. याचाच प्रत्यत नुकताच विजयला आला. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेल्या विजयला पाहताच एक चाहती प्रचंड रडू लागली. विशेष म्हणजे विजयनेदेखील या चाहतीचं सांत्वन करुन तिला शांत केलं.

विजयची मुख्य भूमिका असलेला ‘डिअर कॉमरेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या विजय आणि चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान, विजय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस तामिळ ३’च्या सेटवर गेला होता. यावेळी सेटवर विजयला पाहताच त्याची एक चाहती रडू लागली. या चाहतीला रडताना पाहून विजयने तिला जवळ घेतलं आणि तिचं सांत्वन केलं. एका फॅनसोबत अगदी सामान्य असल्याप्रमाणे विजय वावरल्यामुळे सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, सध्या विजय ‘डिअर कॉमरेड’साठी बंगळुरु, कोच्ची, चेन्नई आणि हैदराबाद येथे प्रमोशन करत आहे. डिअर कॉमरेड या चित्रपटाचं दिग्दर्शन भारत कम्मा यांनी केलं असून अभिनेत्री रश्मिका मंदाना विजयसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट लवकरच हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने या हिंदी चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 10:37 am

Web Title: dear comrade star vijay deverakonda consoles female fan after she breaks down upon meeting actor ssj 93
Next Stories
1 ….तर नाटकात काम करणार नाही-सुबोध भावे
2 VIDEO: ‘ढिंच्याक पूजा’चे ‘नाच के पागल’ हे नवीन गाणं ऐकून नेटकरी झाले पागल
3 ओळखा पाहू हा बॉलिवूड अभिनेता कोण?
Just Now!
X