19 September 2020

News Flash

मनिषा कोईरालाच्या ‘डिअर माया’चा ट्रेलर प्रदर्शित

या दोन्ही मुली एका मुलाच्या नावाने मायाला खोटी प्रेमपत्र पाठवतात

मनिषा कोईरालाचा नवीन सिनेमा 'डिएर माया'

मनिषा कोईराला अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. पण तिच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. तिच्या आगामी’डिअर माया’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधला तिचा अभिनय पाहून मनिषा एवढी वर्षे सिनेसृष्टीपासून लांब होती, यावर विश्वास बसणार नाही. हा ट्रेलर पाहून सिनेमा नक्की कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहे. या सिनेमातून मनिषा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. अगदी थोड्याच वेळात या ट्रेलरला लाखोंमध्ये लाइक्स मिळाले आहेत.

मनिषा सिनेमात माया नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसते. जी २० वर्षे एका घरात एकटी राहत असते. ती कधीच बाहेर पडत नाही. पण, शाळेत शिकणाऱ्या दोन मुली मायाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. मायाने घरातून निघून बाहेरच जग पाहावं अशी त्यांची इच्छा असते. यासाठी त्या एक शक्कलही लढवतात.

या दोन्ही मुली एका मुलाच्या नावाने मायाला खोटी प्रेमपत्र पाठवतात. मायाही त्या पत्रांवर विश्वास ठेवते. अचानक आयुष्यात आलेल्या या वळणामुळे मायाही सुखावून जाते. तिच्या आयुष्यात आनंद परत येतो. मात्र एक दिवस माया आपल्या प्रियकराला शोधण्यासाठी घरातलं सगळं सामान विकून दिल्लीला निघून जाते. पण दिल्लीला गेल्यावर मायासोबत काय होतं? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित करून ट्रेलर संपतो. २ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘डिअर माया’नंतर मनिषा संजय दत्त याच्या जीवनावर आधारीत आत्मचरित्रपटात नर्गिसची भूमिका साकारताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 8:17 pm

Web Title: dear maya trailer manisha koiralas film is about a lonely woman search for love
Next Stories
1 Baahubali 2 box office collection day 7: ‘बाहुबली २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन बघून तुम्हीही व्हाल चकीत!
2 कपिलच्या शोचा घसरलेला टीआरपी पाहून सुनील म्हणतो..
3 हॉलिवूड चित्रपटावरून कॉपी केलाय सलमानचा ‘ट्युबलाइट’
Just Now!
X