अभिनेता शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्ट एकाच चित्रपटात काम करणार ही माहिती मिळताच काही महिन्यांपूर्वी अनेकांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. किंग खान आणि आलिया भट्ट एकत्र काम करणार ही बाब अनेकांना पचत नव्हती. पण या चित्रपटाची एक-एक झलक जसजशी सर्वांसमोर येत गेली त्याचप्रमाणे ‘डिअर जिंदगी’बद्दलचे चित्र अनेकांसमोर उघड होत गेले. त्यामुळे आता या आगामी चित्रपटातून किंग खान आणि आलियाची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहेत. प्रेम, नाती, ब्रेकअप आणि त्यातून घडत जाणारं आयुष्य यांचे सुरेख चित्रण या चित्रपटामध्ये केले गेले आहे.

या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान ‘जहांगीर खान’ नावाचे एक पात्र साकारत आहे. ज्यामध्ये तो एका मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेत दिसेल. आलियाने साकारलेली ‘कायरा’ आणि शाहरुखने साकारलेल्या ‘जहांगीर’ या पात्रांची भेट घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. २५ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

हा चित्रपट शाहरुखसाठी एका अर्थाने वेगळा ठरणारा आहे. त्याचे झाले असे की, ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट शाहरुख खानच्या गेल्या पाच वर्षांतील त्याचा सर्वात कमी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा एक चित्रपट ठरणार आहे. मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय आणि त्याचे दूरगामी परिणाम या चित्रपटावरही झालेले पाहायला मिळत आहेत. शाहरुख खानचा हा बहुचर्चित चित्रपट संपूर्ण भारतात जवळपास फक्त ११०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सहसा किंग खानचे चित्रपट म्हटले की ते ३५०० ते ५००० चित्रपटगृहांतून प्रदर्शित होतातच. पण हा चित्रपट याला अपवाद ठरला आहे.

दरम्यान, बॉलिवूड कलाकारांसाठी या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. हा चित्रपट पाहून झाल्यानंतर अनेक कलाकारांनी शाहरुख आणि आलियाचे भरभरुन कौतुकही केले आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने ट्विट करत ‘काल रात्री #DearZindagi पाहून खूपच आनंद झाला. मी अजूनही त्याचाच विचार करत आहे’, असे लिहिले. तर अभिनेत्री सोफी चौधरीनेही या चित्रपटातील शाहरुख खानच्या भूमिकेची स्तुती करणारे एक ट्विट केले. एकीकडे शाहरुखची स्तुती होत असताना दिग्दर्शक होमी अदजानीया यांनी या चित्रपटातील भूमिकेसाठी आलियाचे फार कौतुक केले. त्यांनी केलेल्या ट्विटमधून या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचेही कौतुक केले आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल कसबेकरनेसुद्धा आलिया भट्टच्या भूमिकेबद्दल तिला शाबासकी दिली आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडकरांचा उत्साह पाहता या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवरही कायम राहणार का? हे अवघ्या काही तासातच उघड होईल.

आलियाने साकारलेल्या ‘कायरा’च्या ब्रेकअपनंतर तिच्या जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या वळणांचे चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आले आहे. कुणाल कपूर, अंगद बेदी आणि अली जफर यांच्या येण्याने ‘कायरा’च्या जीवनात उद्भवलेले पेचप्रसंग या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येतात. अभिनेता शाहरुख खानही या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. बिकट प्रसंगांमधून सावरण्यासाठी शाहरुख या चित्रपटामध्ये आलियाची म्हणजेच कायराची मदत करताना दिसत आहे. अशा वेगळ्या धाटणीचे कथानक असलेल्या या चित्रपटाची उत्सुकता सर्वसामान्यांमध्येही तेवढीच आहे.