News Flash

..म्हणून आलिया म्हणाली ‘जस्ट गो टू हेल’

अलिया भट्टच्या स्वभावाच्या विविध छटा पाहावयास मिळत आहेत.

छाया सौजन्य- युट्यूब

अभिनेत्री आलिया भट्टची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाचा चौथा टिझर म्हणजेच ‘टेक ४’ प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्टने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा टिझर शेअर केला आहे. या टिझरमध्ये नेहमीच हसती खेळती दिसणारी आलिया भट्ट काहीशा वेगळ्या रुपात दिसत आहे. ‘डिअर जिंदगी’च्या ‘टेक ४’मध्ये भावनिकरित्या कोलमडून गेलेली आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेता शाहरुख खान आणि अलिया भट्ट या टिझरमध्ये दिसत आहेत. तर, किंग खान यामध्ये आलियाला आयुष्यासंबंधीची शिकवण देताना दिसत आहे. आलियाने साकारलेल्या कायराची समजूत काढत असताना ‘पागल वो होता है जो रोज रोज सेम काम करता है’ हे अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे वाक्य या चित्रपटाच्या टिझरमध्ये वापरण्यात आले आहे. ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटामध्ये अलिया भट्टच्या स्वभावाच्या विविध छटा पाहावयास मिळत आहेत. टिझरमध्ये प्रेमभंगाला सामोरी गेलेली आलिया भट्ट ‘जस्ट गो टू हेल..’ या गाण्यावर अगदी मनमुरादपणे ताल धरत तिचा सर्व तणाव दूर करत आहे. त्यामुळे हा टिझर पाहता ‘डिअर जिंदगी’बद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

याआधीही या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. प्रत्येक टिझरच्या माध्यमातून या चित्रपटाची वेगवेगळी बाजू प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या ‘टेक ४’पूर्वी प्रदर्शित झालेल्या एका टिझरमध्ये अभिनेता कुणाल कपूरही झळकला होता. शाहरुख खान, आलिया भट्ट आणि कुणाल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे जाहिरपणे प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि ब्रेकअपमधून सावरण्यासाठी प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातून मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 12:58 pm

Web Title: dear zindagi take 4 shah rukh khan tells alia bhatt why we cant love freely and makes a lot of sense watch video
Next Stories
1 ..अन् सनीच्या मदतीला धावला आमिर खान
2 माझा पार्टनर हॉट नसला तरी चालेल- आलिया भट्ट
3 करण जोहर करणार ‘सैराट’चा रिमेक?
Just Now!
X