अमली पदार्थ सेवन प्रकरणाची चौकशी केल्याचा परिणाम

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येच्या तपासापासून सुरू झालेले वादळ अमली पदार्थाच्या सेवन आणि व्यापाराच्या निमित्ताने बॉलीवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींवर घोंघावू लागले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आघाडीच्या अभिनेत्रींची चौकशी केल्याने त्यांच्या जाहिरातीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाकडून दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकु ल प्रीत सिंग या आघाडीच्या अभिनेत्रींची चौकशी झाली.  मोठमोठय़ा ब्रॅण्डसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चौघींच्या जाहिराती तात्पुरत्या का होईना थांबवण्याचा विचार कॉर्पोरेट विश्वात सुरू आहे. काही जाहिरातींचे प्रसारण सध्या थांबवण्यात आले असून या चौघींचाही जाहिरातविश्वातील भाव कमालीचा घसरणार असल्याची चर्चा सुरू आहे.

बॉलीवूडमधील आघाडींच्या अभिनेत्रींपैकी सर्वाधिक जाहिराती किं वा ब्रॅण्डशी जोडली गेलेली अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणचे नाव घेतले जाते. दीपिका सध्या विविध १९ ब्रॅण्ड्सचे प्रतिनिधित्व करत आहे. तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूरही मोठमोठय़ा ब्रॅण्ड्सशी जोडल्या गेल्या आहेत. एखादा कलाकार वादविवादात सापडला की आपोआप त्याची लोकांच्या मनातली प्रतिमा डागाळते आणि त्याचा परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर होतो, असे मत ‘करी नेशन’ या जाहिरात कं पनीच्या प्रीती नायर यांनी व्यक्त केले.

असाही एक सूर

या अभिनेत्रींची अजूनही चौकशी सुरू आहे, त्यांच्यावरचा कु ठलाही आरोप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रश्नच नाही, त्यांच्या जाहिराती थांबवल्या गेल्या तरी तो तात्पुरता परिणाम असेल, असे ट्रेड विश्लेषक  कोमल नहाटा यांनी स्पष्ट के ले.ोाआधी अभिनेता संजय दत्तला अटक झालेली असतानाही ‘खलनायक’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो चांगला चालला. अभिनेत्री रेखा यांचे पती मुके श यांनी आत्महत्या के ल्यानंतर रेखावर समाजात चहूबाजूंनी टीका झाली होती. मात्र त्याच काळात प्रदर्शित झालेला तिचा ‘फु ल बने अंगारे’ चित्रपटही यशस्वी ठरला. लोकांना कलाकारांच्या भूमिका जास्त महत्त्वाच्या असतात, असे नहाटा यांनी स्पष्ट केले.

सध्या कलाकारांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा चेहरा हीच ब्रॅण्डची ओळख ठरते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व झाकोळले गेले तर त्याचा थेट परिणाम ब्रॅण्ड्सवर होत असल्याने कं पन्यांना जाहिरातींसंदर्भात काही ना काही भूमिका घ्यावीच लागेल.

– प्रीती नायर, करी नेशन जाहिरात कंपनी