23 October 2019

News Flash

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा २०१९

सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते

गेल्या ३० वर्षांत आपली आगळी-वेगळी ओळख बनविणाऱ्या पुणे स्थित आणि नोंदणीकृत चॅरिटेबल संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे यावेळी संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले गेले. प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून प्रत्येक वर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळयाचे वितरण काल दिनांक २४ एप्रिल, २०१९ रोजी मुंबई येथील षणमुखानंद हॉल येथे पार पडले. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असून यावर्षीच्या विजेत्यांना आरएसएस प्रमुख माननीय श्री मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.

यावर्षीचे संगीत आणि कला क्षेत्रातील नामवंत शास्त्रीय नर्तकी श्रीमती सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव श्री सलीम खान यांना प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी श्री मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार तर श्रीमती हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित केले गेले. तसेच साहित्य क्षेत्रात श्री वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्कारांनी पुरस्कृत केले गेले. भद्रकाली प्रॉडक्शनचे ‘सोयारे सकाळ’ हे नाटक मोहन वाघ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

First Published on April 25, 2019 4:37 pm

Web Title: deenanath mangeshkar award 2019