जाज्वल्य हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे मंगेशकर कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध होते. सावरकर हे एक उत्कृष्ट साहित्सिक होते. त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता एवढेच नव्हे तर वृत्तपत्रांमधून त्यांचे येणारे लेख देखील विल्यम शेक्सपियर सारख्या साहित्यिकांना लाजवतील इतके जबरदस्त असायचे.

त्यांनी लता मंगेशकर यांचे वडिल दिनानाथ मंगेशकर यांच्यासाठी संन्यस्त खड्ग या नावाचे एक नाटक लिहिले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग १८ सप्टेंबर १९३१ रोजी सादर करण्यात आला होता. या घटनेला आता ८८ वर्षे पुर्ण झाली आहेत. या निमित्ताने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या जुन्या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

लता मंगेशकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सावरकरांसोबत असलेल्या आपल्या घनिष्ठ संबंधांनवर प्रकाशझोत टाकला आहे.

याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केले होते. त्या काळी सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तान जन्मालाच आला नसता, शिवाय सावरकर यांचा भारतरत्न देऊन गौरव करण्याची मागणी त्यांनी केली होती. या पार्श्वभूमिवर लता मंगेशकर यांचे ट्विट अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.