29 September 2020

News Flash

महाराष्ट्राच्या ‘बेबी कंगना रणौत’ने जिंकली ‘सुपर डान्सर’ परीक्षकांची मने

या शोची चर्चा होतेय ती महाराष्ट्रातील अवघ्या १० वर्षांच्या दिपाली बोरकर या चिमुकलीमुळे.

दिपालीने तिच्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने तिन्ही परीक्षकांची मने जिंकली आहेत.

बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी टेलिव्हिजनवर बच्चे कंपनीसाठी बरेच रिअॅलिटी शो सुरु असलेले आपण पाहतोय. त्यापैकी सध्या चालू असलेला असाच एक कार्यक्रम म्हणजे सोनी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर’. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, दिग्दर्शक अनुराग बसू आणि नृत्य दिग्दर्शक गीता कपूर या शोचे परीक्षक आहेत. विशेष म्हणजे या शोची चर्चा होतेय ती महाराष्ट्रातील अवघ्या १० वर्षांच्या दिपाली बोरकर या चिमुकलीमुळे.
दिपालीने तिच्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने तिन्ही परीक्षकांची मने जिंकली आहेत. पहिल्या राऊन्डमध्ये कंगना रणौतच्या ‘बावरी हो गई’ या गाण्यावर दिपालीने जो दमदार परफॉर्मन्स दिला त्यानंतर सर्वांचेच चेहरे पाहण्यासारखे होते. जणू काही आपल्यासमोर कंगनाच नाचत असल्याची प्रतिक्रिया शिल्पाने दिली. गीता यांनी तर चक्क उभं राहून तिच्या नृत्याला दाद दिली. दुस-या राउन्डमध्ये दिपालीने ‘नटरंग’च्या गाण्यांवर नृत्य सादर करताच बच्चेकंपनीना मुलांना या शोमध्ये प्रशिक्षण देणा-या मेन्टर्सनी दिपालीकडे धाव घेत तिला घट्ट मिठी मारली. प्रत्येक मेन्टरने सदर शोसाठी आपल्याला दिपालीच हवी असल्याचा आग्रह परीक्षकांकडे केला. परीक्षकांनीही एकमेकांची मते न जाणता दिपालीला थेट टॉप १२ मध्ये एण्ट्री देण्याचा निर्णय घेतला. दिपाली केवळ नृत्यातचं पारंगत नाहीए तर तिच्या चेह-यावरील हावभाव ही इतके बोलके आहेत की तिच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. सैराटमधील आर्चीच्या संवांदांनी तर सर्वांनाच भुरळ पाडली होती. दिपलीनेही आर्चीची हुबेहुब भूमिका साकारत परीक्षकांना मंत्रमुग्ध केले.

सुपर डान्सर या शोच्या मंचावर बच्चे कंपनी त्यांचे डान्स परफॉर्मन्स सादर करत असून त्यातून १२ मुलांची निवड करण्यात आली आहे. या १२ मुलांना प्रत्येकी एक प्रशिक्षक डान्सर देण्यात आलाय. या शोमध्ये दिपालीने महाराष्ट्राची बेबी कंगना रणौत म्हणून ओळख निर्माण केली आहे. ही बेबी कंगना आपल्या नृत्याने सर्वांना अजून किती दंग करणार हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे  राहिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 12:08 pm

Web Title: deepali borkar christened as baby kangana ranaut in super dancer
Next Stories
1 Sairat : ‘आर्ची’ शिकणारच; कुटुंबाचा खुलासा
2 चक्क जेनेलियानेच रितेशला मिळवून दिले त्याचे हरवलेले पहिले प्रेम….
3 सैफने ठरवले त्याच्या होणाऱ्या बाळाचे नाव..
Just Now!
X