19 January 2021

News Flash

पारंपरिक कोंकणी पद्धतीनं पार पडला दीप-वीरचा साखरपुडा

दीपिका आणि रणवीर हे दोघंही कोंकणी आणि सिंधी पद्धतनीनं विवाह करणार आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी फुल मुड्डीचा विधी पार पडला.

दीपिका -रणवीर

बॉलिवूड आणि चाहत्यांना ज्या विवाहाची प्रतीक्षा लागून आहे असा दीपिका आणि रणवीर सिंगचा विवाहसोहळा आज संपन्न होणार आहे. इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये हा सोहळा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून लग्नातल्या इतर विधींना सुरूवात झाली असून लग्नाच्या आदल्या दिवशी कोंकणी पद्धीतनं दोघांचा साखरपुडा पार पडला.

दीपिका आणि रणवीर हे दोघंही कोंकणी आणि सिंधी पद्धतनीनं विवाह करणार आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी फुल मुड्डीचा विधी पार पडला. पारंपरिक कोंकणी पद्धतीनुसार वधुचे पिता वराचं आणि त्याच्या कुटुंबीयांच श्रीफळ देऊन स्वागत करतात. त्यानंतर वधु वर एकमेकांना अंगठी घालतात. साखरपुडा पार पडल्यानंतर लेक कोमो परिसरातच संगीत सोहळाही पार पडला. गायिका हर्षदीप कौरने या संगीत सोहळ्याला चार चाँद लावले होते. यावेळी दिलबरो, मनमर्जियां यांसारखी बॉलिवूड सुपरहिट गाणी तिनं गायली.

दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातले मोजकेच लोक इटलीतल्या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यातील कोणतेही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट रणवीर आणि दीपिकानं ठेवली असल्याचं समजत आहे. १४ आणि १५ नोव्हेंबरला पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी शाहरुख, फराह खान संजय लीला भंन्साळीसह केवळ चाळीसच लोक उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2018 11:28 am

Web Title: deepika and ranveer officially engaged in traditional konkani ceremony phool muddi
Next Stories
1 #MeToo : ‘सिंटा’ने आलोक नाथ यांना दाखवला बाहेरचा रस्ता
2 #ChildrensDay : एकदा तरी तुमच्या मुलांना हे सिनेमे दाखवाच
3 ‘केदारनाथ’च्या ट्रेलरमधील या दृश्यावरून भन्नाट मीम्स व्हायरल
Just Now!
X