News Flash

दीपिकाने विचारला ‘तो’ प्रश्न अन् सुरु झाली दीप-वीरची लव्हस्टोरी

राग अनावर झाल्यामुळे दीपिकाने विचारला रणवीरला थेट प्रश्न

१४-१५ नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो परिसरात असलेल्या एका आलिशान व्हिलामध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. आजही जोडी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइमुळेदेखील कायम चर्चेत असते. त्यामुळ त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. २०१८ मध्ये या दोघांनी इटलीमध्ये मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. विशेष लग्नापूर्वीपासून या दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांमध्ये चर्चेत असते. त्यामुळे दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली ते पाहुयात.
एका चॅट शोमध्ये दीपिकाने रणवीर आणि तिची लव्हस्टोरी शेअर केली होती. सिंगापूरमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात या दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दुसरी भेट यशराज स्टुडिओमध्ये झाली. या भेटीनंतर त्यांच्यातील ओळख आणि मैत्री वाढली व याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

“आम्ही पहिल्यांदा सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये भेटलो होतो. त्यानंतर आमची दुसरी भेट यशराज स्टुडिओमध्ये सुरु असलेल्या चित्रीकरणादरम्यान झाली. या भेटीवेळी आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी बोललो. मी यशराज स्टुडिओमध्ये शूटिंग करत होते. त्यावेळी रणवीरही तेथे आला होता. विशेष म्हणजे रणवीर त्यावेळी अन्य एका मुलीला डेट करत असतानाही माझ्याशी फ्लर्ट करत होता. बराच काळ गेल्यानंतर न राहावून मी त्याला तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने अजिबात नाही, असं उत्तर त्याने दिलं. त्याचं हे उत्तर ऐकून मी ठामपणे तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस”, असं सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

आणखी वाचा- ‘जर मी दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित झाले तर…’; दीपिकाने रणवीरला आधीच केलं होतं स्पष्ट

पुढे ती म्हणाली, “या भेटीनंतर आम्ही परत एकदा भन्साळी यांच्या घरी भेटलो. त्यांनी ‘रामलीला’ चित्रपटाच्यावेळी आम्हाला जेवायला बोलावलं होतं. यावेळी आमच्यामध्ये बऱ्याच गप्पा झाल्या. तेव्हा तो असा काळ होता, जेव्हा मला रणवीर खूप स्पेशल वाटू लागला होता”.

दरम्यान, ‘रामलीला’नंतर दीप-वीर ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते. विशेष म्हणजे अनेक वेळा त्यांची भेट केवळ भन्साळींमुळेच झाली. त्यानंतर दीप-वीरने जवळपास ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 8:38 am

Web Title: deepika birthaday special know the love life of ranveer and deepika ssj 93
Next Stories
1 अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल
2 अक्षय कुमारचे बँक खाते आणि अमिताभ याच्या कपाटातील कपड्यांवर ‘या’ अभिनेत्याची नजर
3 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मध्ये प्रिया मराठेची एण्ट्री
Just Now!
X