28 September 2020

News Flash

राम मंदिराच्या भूमिपूजनावर दीपिका चिखलीया यांनी शेअर केला व्हिडीओ, म्हणाल्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन पार पडलं

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. मागील काही दिवसांपासून अयोध्येत या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. यासाठी अवघी अयोध्यानगरी सजली. त्यामुळे सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत ही एकच चर्चा रंगली आहे. अशातच ‘रामायण’ या मालिकेत सीता हे पात्र सकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी पोस्ट करत आनंद व्यक्त केला.

दीपिका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी हातात पणती घेतली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी सर्व भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असे म्हटले आहे.

यापूर्वी अरुण गोविल यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला होता. त्यांनी भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाणार आहे असे म्हटले आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली होती. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले आहे. यावर अनेक कालाकार आपल्या प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.

मंदिराचे प्रारूप

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच राम मंदिराच्या प्रारूपाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे मंदिर तीन मजली असून १६१ फूट उंच असेल. मंदिराच्या मूळ आराखडय़ात बदल करण्यात आला असून आता मंदिराचा आकार व उंची दुपटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक भक्तांना एकाच वेळी रामाचे दर्शन घेता यावे यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 5:25 pm

Web Title: deepika chikhaliya welcomed lord ram by lighting diya avb 95
Next Stories
1 चाहत्यांच्या मागणीमुळे ‘दिल बेचारा’ चित्रपटातील गाणे यूट्यूबवर प्रदर्शित
2 मृणाल कुलकर्णीने सांगितला ‘फत्तेशिकस्त’च्या शूटिंगदरम्यानचा अविस्मरणीय किस्सा
3 लेबनान स्फोट : अत्यंत धक्कादायक घटना; शिल्पा शेट्टीने व्यक्त केली हळहळ
Just Now!
X