लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पहायला मिळते. सध्या ते काय करत आहेत हे देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना सांगताना दिसतात. अशातच बॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीचे सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करणयात आले आहे. स्वत: या अभिनेत्रीने ही माहिती दिली असून चाहत्यांना सावध राहण्यास सांगिले आहे.

या अभिनेत्री म्हणजे रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत सीता हे पात्र साकारणाऱ्या दीपिका चिखलिया आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार करण्यात असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी माझे इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंटवर तयार करण्यात आले आहे आणि या अकाऊंटद्वारे डोनेशन मागण्यात येत आहे. कृपया चाहत्यांनी सावध रहा असे म्हटले आहे.

दीपिका यांच्या या फेक अकाऊंटवर जवळपास पाच हजार फॉलोअर्स आहेत. त्यामुळे कोणीतरी या अकाऊंचा गैरवापर करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अकाऊंटद्वारे चाहत्यांकडे डोनेशनचे पैसे मागण्यात येत असल्यामुळे दीपिका यांनी ट्विट करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.