23 September 2020

News Flash

वाढदिवसाच्या मुहूर्तावर दीपिका तिच्या चित्रपटांचे रहस्य उलगडणार

गेले वर्ष बॉलिवूडवर कुणा एका ‘खाना’ची नव्हे तर दीपिका पदुकोणची सद्दी होती.

| January 3, 2014 11:05 am

गेले वर्ष बॉलिवूडवर कुणा एका ‘खाना’ची नव्हे तर दीपिका पदुकोणची सद्दी होती. एकापाठोपाठ एक चार हिट चित्रपट देणारी दीपिका ही गेल्यावर्षीची खरेतर ५०० कोटी क्लबची नायिका म्हणता येईल. पण, अजूनतरी आपल्याकडे एका चित्रपटागणिकच यशाचे मूल्यमापन केले जाते. त्यामुळे, दीपिकाच्या नावावर हा स्वतंत्र क्लब सुरू करता येणार नाही. मात्र, या यशामुळे दीपिकाकडून एकूणच इंडस्ट्रीच्या आणि प्रेक्षकांच्याही अपेक्षा वाढल्या आहे. दीपिकाही ही गोष्ट जाणून असल्याने तिने आपल्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर यावर्षीचे तिचे महत्त्वाचे चित्रपट जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षीसाठी म्हणून दीपिकाने फराह खान दिग्दर्शित ‘हॅप्पी न्यू इअर’चे चित्रिकरण सुरू केले आहे. शिवाय, होमी आदजानिया दिग्दर्शित ‘फाईंडिंग फॅनी’चे चित्रिकरणही अर्धे झाले आहे. शिवाय, इम्तियाज अलीनेही तिच्याबरोबर आगामी चित्रपट करणार असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे, पुढच्या वर्षीसाठी हे तीन मोठे चित्रपट आहेत याची माहिती असूनही आणखी दोन महत्त्वाच्या चित्रपटांची घोषणा दीपिका आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करणार आहे. त्यामुळे, आता दीपिका आणखी कोणत्या चित्रपटांविषयी सांगणार याचीही उत्सुकता लोकांमध्ये आहे.
दीपिका पुढच्या वर्षी सलमान खानची नायिका म्हणून सूरज बडजात्यांच्या चित्रपटात दिसणार, अशी चर्चा आहे. या चित्रपटांसाठी तिची तारखांची जुळवाजुळव सुरू होती त्यामुळे तिने किंवा बडजात्यांनीही या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. वाढदिवसाच्या दिवशी दीपिका या चित्रपटाची घोषणा क रेल, असे म्हटले जात आहे. पण, याशिवाय दुसरा चित्रपट कोणता? हे क ोडे उलगडायला तयार नाही. गेल्यावर्षीच्या यशासाठी इंडस्ट्रीतील तिच्या सहकाऱ्यांनी तिच्याकडून आग्रहाने दणक्यात पार्टी करून घेतली आहे. पण, या यशामुळेच असेल अचानक नंबर वन अशी गणना होऊ लागलेली दीपिका सध्या प्रत्येक गोष्ट जाहीरपणे करण्यावर भर देते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2014 11:05 am

Web Title: deepika padukon reveal her new movies 2014
Next Stories
1 पाहा : ‘क्वीन’ चित्रपटातील ‘लंडन ठुमका’ गाणे
2 शाहरुखच्या आयपीएल टीमवर बनणार ‘माहितीपट’
3 ‘नटी’मध्ये झळकणार तेजा देवकर
Just Now!
X