दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ या चित्रपटानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण त्यांच्या पुढील चित्रपटातही मुख्य भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. तर यामध्ये साहिर लुधियानवी यांच्या भूमिकेत अभिषेक बच्चन दिसणार असल्याची माहिती ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिली आहे.
अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित असणार आहे. सध्या या चित्रपटासाठी आवश्यक असणारी माहिती संकलित केली जात असून ‘पद्मावती’च्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाचे काम सुरू होणार आहे. अमिताभ बच्चन यांनी साहिर लुधियानवी यांच्यासोबत ‘कभी- कभी’ आणि ‘त्रिशूल’ या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी अभिषेकला बिग बींचीही मदत होणार आहे.
अभिषेकच्या आधी भन्साळी यांनी मुख्य भूमिकेसाठी शाहरुख खानला विचारणा केली होती. याविषयी शाहरुख म्हणाला की, ‘या चित्रपटाची पटकथा जसनीतनं लिहिली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने साहिर लुधियानवी यांच्यावरील कथा मला ऐकवली होती. कथा मला फार आवडलेली, मात्र वेळेअभावी आम्हाला त्यावर काम करता आले नाही. त्यावेळी ही कथा संजय लीला भन्साळी यांच्याकडे नव्हती.’
PHOTOS : भारती सिंगचा वेडिंग गाऊन पाहिलात का?
दीपिका आणि अभिषेकने यापूर्वी फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ आणि आशुतोष गोवारीकर यांच्या ‘खेलें हम जी जान से’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 4, 2017 8:33 pm